बेळगावात येऊ नका ; मुख्यमंत्री बोम्मईंचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावरुन राजकारण तापलं आहे.
Basavraj Bommai| Chnadrakant Patil
Basavraj Bommai| Chnadrakant Patil

Maharashtra Karnatak Border Dispute | कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावरुन राजकारण तापलं आहे. असे असताना मंत्री चंद्रकांत पाटील येत्या दोन-चार दिवसात बेळगाव दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा इशारा कर्नाटकचे मुख्मंमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे.

इतकेच नव्हे तर, महाराष्ट्रातील कोणताही नेता छुप्या मार्गाने बेळगावमध्ये दाखल होऊ नये, म्हणून सीमाभागात दोन हजार कर्नाटक पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला असून जागोजागी नाके तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचा एकही मंत्री बेळगावात जाऊ नये, म्हणून बोम्मई सरकारने कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सीमाभागातील 21 नाक्यांवर जवळपास दोन हजारो पोलिस तळ ठोकून आहेत. सहा डिसेंबरपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत.

Basavraj Bommai| Chnadrakant Patil
Jitendra Awhad : आव्हाडांचा कानाला खडा; 'त्या' प्रकरणानंतर नाकारलं एकनाथ शिंदेंचं आमंत्रण

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूरमधील अक्कलकोट वर दावा केला होता. त्यामुळे राज्यात दोन्ही राज्यात राजकारण पेटले होता. हे प्रकरण काहीसं शांत होत असतानाच आता पुन्हा एकदा नवा वाद समोर आला आहे.भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे दोन मंत्री आज (३ डिसेंबर) शनिवार बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. परंतु आता ते सहा डिसेंबरला ते बेळगावला जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात सीमेवरून बराच काळ वाद सुरू आहे. महाराष्ट्रातील बेळगाव (बेळगाव) जिल्हा 1960 मध्ये निर्माण झाला आणि तेव्हापासून 80 टक्के मराठी भाषिक गावांचा कर्नाटकशी वाद सुरू आहे. कन्नड भाषिकांची संख्या जास्त असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com