Dispute in Congress : नाना पटोलेंविरोधात असंतोष वाढला;काँग्रेसचे बडे नेते भेटले हायकमांडला

काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी खर्गे यांच्याकडे जाऊन पटोले यांना बदलण्याची मागणी केली आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Maharashtra Congress News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात असंतोष वाढताना दिसत आहे. राज्यातील काँग्रेसची परिस्थिती बदलायची असेल, तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवा, अशी मागणी घेऊन राज्यातील बडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना भेटले आहेत. आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे. (Dissatisfaction against Nana Patole: Senior Congress leaders meet High Command)

प्रदेशाध्यक्ष पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात थेट पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. परिस्थिती बदलायची असेल तर नाना पटोले यांना बदला, अशी मागणी खर्गे यांची भेट घेऊन केली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, मुंबई काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी खर्गे यांच्याकडे जाऊन पटोले यांना बदलण्याची मागणी केली आहे.

Nana Patole
Paranda Bazar Samiti : महाविकास आघाडीच्या संचालकांच्या अपहरण प्रकरणात अजित पवारांनी लक्ष घातले; संचालक पुन्हा अज्ञातस्थळी

विजय वडेट्टीवार हे दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर मोघे, केदार, निरूपम हे राजधानीत पोचले होते. या नेत्यांनी पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त करून राज्यातील काँग्रेसची परिस्थिती बदलायची असेल तर अगोदर पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा, अशी मागणी खर्गे यांच्याकडे लावून धरली आहे.

Nana Patole
Bhagirath Bhalke News : पंढरपूर-मंगळवेढ्यातून विधानसभेची आरपारची लढाई लढणार : राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंची घोषणा

पटोले यांचा राज्यातील कोणत्याही नेत्याशी समन्वय दिसत नाही. काम करताना ते कोणालाही विचारत नाहीत किंवा सोबतही घेत नाहीत. नाना पटोले हे महाराष्ट्रातील नवज्योतसिंह सिद्ध झाले आहेत. काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर पटोले यांना पदावरून तातडीने हटवा, अशी मागणी या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांकडे केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पुनर्रचना झाल्यानंतर महाराष्ट्रातील बदलाबाबत विचार करण्यात येईल. तसेच, योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे खर्गे यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.

Nana Patole
Sangola APMC News: सांगोल्यात पुन्हा शेकापचा बोलबाला... सूतगिरणी, खरेदी-विक्रीसंघानंतर बाजार समितीवरही फडकावला झेंडा!

काही महिन्यांपूर्वीही विदर्भातील नेतेही दिल्लीत जाऊन पटोले यांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती. मात्र, तो प्रयत्न असफल ठरला होता. आता पुन्हा बहुतांश विदर्भातील नेत्यांनी पुन्हा पटोलेंबाबत पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com