तुम्ही शिंदे गटात की ठाकरे..? तुमची भूमिका स्पष्ट करा : डोंबिवलीत शिवसेना शाखेत राडा...

विवेक खामकर यांची तीन दिवसांपूर्वी डोंबिवली शहरप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
Shiv Sainik
Shiv SainikSarkarnama

डोंबिवली : तुम्ही कोणत्या गटात, तुमची भूमिका स्पष्ट करा या कारणावरून डोंबिवलीच्या (Dombivli) दीनदयाळ रोड शिवसेना (Shivsena) शाखेत शहरप्रमुख विवेक खामकर व पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणी विष्णू नगर पोलिस ठाण्यात शहरप्रमुख विवेक खामकर यांच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ, पैसे चोरल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी खामकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. (Dispute over supremacy in Shiv Sena shakha in Dombivli)

दरम्यान, विवेक खामकर यांची तीन दिवसांपूर्वी डोंबिवली शहरप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत खामकर यांनी मात्र मी शाखेत गेलो होतो. शाखा प्रमुखाला नवीन सदस्य नोंदणीबाबत विचारलं. मात्र, माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांनी आरोपांचं खंडन केलं .या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सध्या राज्यभरात शिंदे गट विरुद्ध शिवसेना अशा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही बाजूने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहने, भावनिक साद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीतदेखील या वादाचे पडसाद उमटले आहेत. काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे, त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्यादेखील करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे नुकतेच नियुक्त झालेले डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर शाखांना भेट देत आहेत. काल डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाल रोडवरील शिवसेना शाखेत खामकर काही कार्यकर्त्यांसह आले. या वेळी शाखेत शाखा प्रमुख परेश म्हात्रे, पवन म्हात्रे हे होते. यावेळी खामकर आणि म्हात्रे यांच्यात वाद झाला.

याबाबत परेश म्हात्रे यांनी खामकर काल शाखेत आले होते, त्यांनी तुम्ही कोणत्या गटात, तुमची भूमिका स्पष्ट करा, अस आम्हाला विचारलं. तुम्ही सदस्य नोंदणीचे फॉर्म भरले नाहीत, अस सांगत वाद घालत शिवसेना शाखेवरील नेत्यांचे फोटो असलेला बॅनर काढून टाकला. आमच्याशी वाद घातला एवढेच नाही तर शाखेत असलेली काही महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम पंधरा हजार रुपये घेऊन गेले. या प्रकारानंतर परेश मात्रे यांनी डोंबिवली पश्चिम येथील विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी म्हात्रे यांनी डोंबिवली विष्णू नगर पोलिस ठाण्यामध्ये विवेक खामकर यांच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ, पैसे चोरल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विवेक खामकर यांच्या विरोधात गुन्हा दखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे . आज खामकर यांना कल्याण न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com