मोदी सरकारविरोधातील पदयात्रेतच भाई जगताप अन् झिशान सिद्दीकी भिडले

वाढती महागाई, बेरोजगारी याविरोधात काँग्रेसकडून रविवारी राज्यभरात जन जागरण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
Bhai Jagtap and Zeeshan Siddique
Bhai Jagtap and Zeeshan Siddique

मुंबई : वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र सरकारची निष्क्रियता या विरोधात काँग्रेसकडून (Congress) रविवारी राज्यभरात जन जागरण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतगर्त ठिकठिकाणी पदयात्रा काढली जात आहे. मुंबई काँग्रेसकडूनही रविवारी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पण पदयात्रेच्या सुरूवातीलाच दोन बड्या नेत्यांमध्येच वाद झाल्याने गालबोट लागल्याचे दिसून आले.

मुंबई काँग्रेसतर्फे रविवारी दुपारी दोन वाजता राजगृह (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान) ते चैत्यभूमी, दादर दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या सुरूवातीला नेत्यांसाठी एका ट्रकला सजवून रथाचे स्वरूप देण्यात आले होते. नेत्यांनी या ट्रकचा ताबा घेण्यास सुरू केली होती. यादरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) व मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्यात वादाची ठिणगी पडली.

Bhai Jagtap and Zeeshan Siddique
मोदी सरकारनं सीबीआय अन् ईडीच्या प्रमुखांबाबत घेतला मोठा निर्णय

ट्रक वर चढण्यावरून जगताप आणि सिद्दीकी यांच्यात झाला वाद झाल्याचे समजते. या वादानंतर सिद्दीकी यांनी पदयात्रेत सहभागी न होता निघून गेले. दोन नेत्यांमधील या वादाने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मोदी सरकारविरोधातील पदयात्रेत भर रस्त्यावरच हा वाद समोर आल्यानं काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचे दर्शन घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील नेते ‘आमच्यामध्ये सर्व काही छान चाललंय...’, असे वारंवार सांगत असतात. पण अधूनमधून एकमेकांवर कुरघोड्यादेखील करत असतात. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप म्हणजेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वादात कॉंग्रेस शांत आहे. पण कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच सहकारी मित्रपक्षाने घेतल्याचे सांगत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Bhai Jagtap and Zeeshan Siddique
पुण्यात प्रशिक्षित कर्नल कुटुंबासह पहिल्यांदाच चेक पोस्टवर गेले अन् घात झाला!

ज्या लोकांनी ही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. आमच्यावर ईडी लागत आहे. म्हणून कॉंग्रेसला बदनाम करणारी लोक आमच्या मित्रपक्षात आहेत, असे म्हणत महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला नाना पटोले यांनी तोंड फोडल्याचे मानले जात आहे. विदर्भातील गोंदीया येथे कॉंग्रेसच्या मेळाव्यात नाना बोलत होते. हे सांगताना त्यांनी मित्रपक्ष असा उल्लेख केला, पण राष्ट्रवादी कॉंग्रेस की शिवसेना, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी नेमकी घेतली कुणी, याचा शोध राजकीय धुरीणांनी घेणे सुरू केले आहे.

‘सुपारी घेतली’ हे वक्तव्य करून त्यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये नवा वाद सुरू होईल, असे सांगितले जात आहे. याचा फायदा विरोधी पक्ष भाजप उचलण्यास तयार बसली आहे, असेही काही राजकीय जाणकारांचे मत आहे. पण एकदा बोलल्यानंतर मागे हटणाऱ्यांमधून नाना पटोले निश्‍चितच नाहीत. त्यामुळे पुढील काळात कॉग्रेसला बदनाम करण्याची सुपारी नेमकी घेतली कुणी, हेसुद्धा ते स्पष्ट करतीलच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com