Disha Salian| मुख्यमंत्र्यांचा मला दोन वेळा फोन: राणेंचा गौप्यस्फोट

Disha Salian|narayan rane| अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप केले.
narayan rane
narayan rane

मुंबई : "मी सुरुवातीपासून जे घडलं ती सर्व माहिती माझ्या स्टेटमेंटमध्ये दिली आहे. एवढंच नाही, सुशांत आणि दिशाची हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddha Thackeray) यांचा दोनवेळा फोन आला. सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका. एक मंत्र्यांची गाडी होती असं बोलू नका,'' असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप केले आहेत. (Disha salian latest news update)

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप केले. या आरोपांवरुन दिशाच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.या तक्रारीनंतर राणे पिता पुत्रांची मालडच्या मालवणी पोलीस ठाण्यात सलग नऊ तास चौकशी करण्यात आली. सलग नऊ तास झालेल्या चौकशीनंतर राणे बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं थेट नाव घेतलं आहे.

narayan rane
काळा पैसा पांढरा करण्यात शिवसेनेच्या जाधवांनी भुजबळांनाही मागे टाकलेय!

नारायण राणे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना बोललो असं का बोलायचं नाही? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. तुम्हालाही मुले आहेत. तुम्ही असं काही करु नका. पण माझं माझे हे वाक्य वगळण्यात आलं. म्हणजेच, राजकीय हेतूने मुद्दामून आमच्यावर दबाव टाकून आमच्यावर केस करण्याच प्रयत्न केला गेला. पण आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही", असं नारायण राणे म्हणाले.

"मला दोन दिवसांपूर्वी मालवणी पोलीस ठाण्यामधून एक नोटीस आली होती. दिशाच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगण्यासाठी बोलावण्यात आल्यांच सांगण्यात आले. पण दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, तिचे खरे आरोपी पकडले गेले पाहिजेत असे आम्ही वारंवार बोलत होतो. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर दिशाच्या कुटुबियांकडे जात त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. दिशाला न्याय मिळवण्याची मागणी असताना तिची आई म्हणते बदनामी होते, अशी खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रार घेतली आणि आम्हाला चौकशीसाठी बोलवलं. आम्ही 9 तास पोलीस ठाण्यात होतो", असं नारायण राणे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com