Aditya Thackeray : भाजप नेत्यांविरोधात ठाकरेंची न्यायालयात धाव ?

Disha Salian death case : दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव सातत्याने घेतले जात आहे.
Aditya Thackeray, Narayan Rane
Aditya Thackeray, Narayan Rane Sarkarnama

Disha Salian death case : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांना शिंदे गटानं घेरलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना टार्गेट करीत आहे. दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव सातत्याने घेतले जात आहे.

या आरोपांच्या विरोधात आदित्य ठाकरे हे न्यायालयात धाव घेणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असल्याचे समजते. बदनामी करणार्‍या नेत्यांविरोधात आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray, Narayan Rane
Eknath Shinde : एका आमदारामुळे शिंदे सरकार धोक्यात ? ; कोश्यारींच्या निर्णयाकडे लक्ष

लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंग मृत्यू प्रकरण उपस्थित केले. सुशांतचा मृत्यू होण्याआधी रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर एयू नावाने 44 कॉल आले होते, ते अनन्य उद्धव की आदित्य उद्धव यापैकी कुणाचे होते, याचा खुलासा करण्याची मागणी शेवाळे यांनी केली. शेवाळेंचा हाच मुद्दा विधानसभेत भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

तर दुसरीकडे भाजपचे नेते, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये सभेत आदित्य ठाकरेवर गंभीर आरोप केले. दिशा सालियनवर अत्याचार होत असताना आदित्य ठाकरे तिथे उपस्थित होते, सोडणार नाही. आता भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असल्याने ते जेलमध्ये जाणार, असा दावा राणे यांनी केला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राणे पिता-पुत्रांकडून वारंवार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करीत आहेत. ठाकरे पिता-पुत्र आज नागपुरात आहेत. त्यामुळे शिंदे गट-ठाकरे गट एकमेकांवर काय आरोप-प्रत्यारोप करतात, हे दुपारी समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com