काँग्रेस आमदारांच्या बैठकीत खडाजंगी अन् थोरातांनी हातात घेतली सूत्रे

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली.
Balasaheb Thorat, Nitin Raut, Prithviraj Chavan
Balasaheb Thorat, Nitin Raut, Prithviraj Chavansarkarnama

मुंबई : काँग्रेसचे पालकमंत्री स्थानिक आमदारांशी समन्वय ठेवत नसल्यामुळेच पक्षाच्या आमदारांना विकासकामांसाठी निधी मिळत, नसल्याची तक्रार बुधवारी झालेल्या काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी केली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसचे गुजरातमधली आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) यांच्यावरील बेकायदेशीर कारवाईसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (Sunil Kedar), मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आमदार कुणाल पाटील, पी. एन. पाटील, संग्राम थोपटे, अमित झनक, अभिजित वंजारी, राजेश राठोड यांचा समावेश होता.

Balasaheb Thorat, Nitin Raut, Prithviraj Chavan
ठाकरेंनी सुरूवात केली अन् अन्य राज्येही पंतप्रधान मोदींवर तुटून पडली!

जिग्नेश मेवाणी यांच्यावरील कारवाईबाबत या बैठकीत चर्चा होती. मात्र, आमदारांनी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पुन्हा एकदा पाढा वाचला. ज्या जिल्ह्यात काँग्रेसचे पालकमंत्री आहेत, त्याठिकाणी पालकमंत्री स्थानिक आमदारांशी समन्वय ठेवत नाहीत. याबद्दल बहुतांश आमदारांनी नाराजी व्यक्त केली. सर्व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर थोरात यांनी आठवड्याला काँग्रेसच्या दहा आमदारांच्या गटागटाची बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर थोरात हे पक्षाच्या आमदारांशी चर्चा करणार असल्याचेही सांगण्यात आले.

Balasaheb Thorat, Nitin Raut, Prithviraj Chavan
शेलारांचा मोठा धमाका : 2017 मध्येच भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती...

आमदारांनी मांडलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चार ज्येष्ठ सदस्यांची समिती करण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. दरम्यान, काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी पक्षा अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्या भेटीमध्येही आमदारांनी निधीबाबत तक्रार केली होती. तसेच मंत्री आमदारांचे प्रश्न ऐकून घेत नसल्याचेही म्हटले होते. त्यानंतर आजच्या बैठकीत पुन्हा एकदा चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com