Amit Shah-Shinde Meeting: राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा; अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांमध्ये बंद दाराआड खलबतं?

Political News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु आहेत.
Amit Shah-Eknath Shinde Meeting
Amit Shah-Eknath Shinde MeetingSarkarnama

Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) हे सरकार स्थिर असून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहतील, असं सांगण्यात येत आहे.

Amit Shah-Eknath Shinde Meeting
Paithan APMC Election : पैठण बाजार समितीवर मंत्री भुमरेंची सत्ता कायम राहाणार का ?

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा राजकीय वर्तुळात असल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच आज अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्वाची बैठक झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे.

या बैठकीमध्ये अमित शाहांनी मुख्यमंत्र्यांना मोठं आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील आगामी सर्वच निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढवल्या जातील, असं आश्वासन शाहांनी त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Amit Shah-Eknath Shinde Meeting
Gopichand Padalkar slapped News : आमदार पडळकरांनी ग्रा. पं. सदस्याच्या कानाखाली वाजवली; केंद्राबाहेर तणावाची परिस्थिती !

त्यामुळे आता यापुढे आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीची धुरा एकनाथ शिंदेंकडे असण्याची शक्यता आहे. तसेच याबाबत सर्वाचं एकमत झालं असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, अमित शाह हे खासगी कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बंद दाराआड बैठक झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या चर्चेत नेमकी काय ठरलं?, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com