उद्धव ठाकरेंच्या वर्तुळात बदल; रवी म्हात्रे इन नार्वेकर आऊट?

मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) पक्षाच्या कामात सक्रीय झाल्याची चर्चा आहे
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या मुंबईतील गटप्रमुखांचा बुधवारी मेळावा घेतला. दसरा मेळाव्याचा ट्रेलर म्हणून या मेळाव्याकडे बघितले जात आहे. मात्र, या मेळाव्यातील अजून एका विषयाची जोरदार चर्चा होत आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती हातात फाईल घेतलेले रवी म्हात्रे अनेक वर्षांनी दिसले.

शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेऊन शिंदेंनी बंड केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गोटात अनेक बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटातील आमदारांनी बंडामागे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवर आरोप केले होते. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि संजय राऊत यांच्यावर रोख दिसून आला होता. त्यामुळे आता नार्वेकर यांच्या ऐवजी रवी म्हात्रे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जास्त प्रमाणात दिसतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

रवी म्हात्रे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. 'मातोश्री'वर बाळासाहेबांकडून येणारे निरोप हे म्हात्रेंकडूनच यायचे. बाळासाहेबांसाठी फोन केला तर तो फोन म्हात्रेच आधी घेत असत. आमदार, खासदार, साध्या शाखाप्रमुखांची व्यथा, तक्रार ते बाळासाहेबांपर्यंत पोहोचवायचे. तसेच बाळासाहेबांच्या कार्यक्रमांचे नियोजन ही म्हात्रेच पाहत होते.

Uddhav Thackeray
वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी आता थेट आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरणार

म्हात्रे शिवसैनिकांना मित्रासारखी वागणूक द्यायचे, असे राजकीय जाणकार सांगतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरे यांच्यासाठीही काम करत होते. मात्र, शिंदे गटाच्या बंडानंतर आता उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक म्हणून मागेपुढे करताना म्हात्रे प्रामुख्याने दिसत आहेत.

ठाकरेंचे खाजगी स्वीय सहाय्यक असलेले नार्वेकर शिवसेनेचे सचिव देखली आहेत. 2018 मध्ये शिवसेनेचे सचिव म्हणून नार्वेकर यांची नियुक्ती झाली. 1994 पासून नार्वेकर हे ठाकरेंशी संपर्क साधू इच्छिणाऱ्या शिवसैनिकांमधील प्रमुख दुवा ते आहेत. तसेच तिरुपती ट्रस्टच्या सदस्य पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाकरेंच्या विविध राजकीय यात्रांचे व राजकीय रणनीतीचे नियोजनही त्यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. तेव्हा मिलिंद नार्वेकर त्यांना भेटायला गेले होते. मात्र, नार्वेकर हे कार्यकर्ते व नेत्यांचे मेसेज मातोश्रीपर्यंत पोहचू देत नाहीत असा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला होता. शिंदे गटातील आमदारांनी नार्वेकरांबद्दलची नाराजी बोलूनही दाखवली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सहाय्यकाची जबाबदारी थोडी कमी करून ते पक्षाच्या कामात सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. बाळासाहेबांची कामे करणारे म्हात्रे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत सतत पाहायला मिळत आहेत.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे कारवर उभे राहून भाषण करणार? पेडणेकरांच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण

दरम्यान, नार्वेकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, नार्वेकर यांनी आपण उद्धव ठाकरे यांचे आनंद दिघे आहोत, असे ट्वीट केले होते. आमदारांनी टीका केल्यामुळे नार्वेकरांना पक्षाच्या कामात सक्रिय करुन म्हात्रे यांच्यावर सहाय्यकाची जबाबदारी दिली का? असा सवाल उपस्थित होते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in