Eknath Shinde News: एशियन बँकेच्या महासंचालकांनाही मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाची भुरळ; मंत्रालयात नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : ...तर शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल!
Eknath Shinde news:
Eknath Shinde news: sarkarnama

Mumbai : राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली. यानंतर शिंदे फडणवीस सरकारकडून राज्यात विकासकामांचा धडाका सुरु असल्याचा दावा केला जात आहे. याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाच्या अनोख्या शैलीचं जसं कौतुक होतं तसंच विरोधकांकडून टीकाही केली जात आहे. पण आता विदेशी पाहुण्यांना शिंदेंच्या कामाची भुरळ पडलेली पाहायला मिळत आहे.

एशियन इन्फास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांनी आपल्या शिष्टमंडळासह मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात सहभागी होऊन त्यांची कार्यपद्धती समजावून घेतली. यावेळी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याची शिंदे यांची हातोटी बघितल्यावर हुन किम प्रभावित झाले. यावेळी त्यांनी शिंदे यांच्या कामाचं कौतुकही केलं.

Eknath Shinde news:
NCP New President : शालिनीताईंचा शरद पवारांना ज्येष्ठतेचा सल्ला ; म्हणाल्या, 'अजित पवार घोटाळेबाज..,त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल!

मुख्यमंत्री शिंदे यांनी हुन किम यांच्यासोबतच्या मंत्रालयातील भेटीदरम्यान शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप,ग्रामीण भागातील रुग्णालयासाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. तसेच सौरऊर्जा प्रकल्पांविषयी एशियन इन्फास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेनं सहकार्य करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी किम यांना केलं आहे. यावेळी एशियन बँकेने सहकार्य केलं तर शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरवणारं महाराष्ट्र(Maharashtra) हे पहिलं राज्य ठरेल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

जनता दरबाराची भुरळ...

मुख्यमंत्री शिंदे हे दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर कामानिमित्त मंत्रालया(Mantralay)त आलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीगाठी घेतात. याही बुधवारी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जनता दरबारात कामानिमित्त आलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेत ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच यात एका अपंग व्यक्तीचे कामही शिंदेंनी ताबडतोब निकाली काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हे दृश्य पाहिल्यावर हुन किम आश्चर्यचकीत झाले. यानंतर किम यांनी जनता दरबाराच्या कामाचं कौतुकही केलं.

Eknath Shinde news:
Pramod Sawant News : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अडचणीत वाढ; बिहारमध्ये गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी हे हुन किम यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या समिती दालनात चर्चा करण्यासाठी बसले होते. काही वेळानंतर मुख्यमंत्री स्वतः तिथे त्यांच्या जनता दरबारासाठी आले. त्याचवेळी हुन हे देखील तिथं उपस्थित असल्याचं पाहून त्यांनी त्यांना देखील या जनता दरबाराचं काम कसं चालतं ते पाहण्यासाठी आमंत्रित केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com