१० हजार ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंच; शिंदे-फडणवीस सरकारने उचचले मोठे पाऊल

महाविकास आघाडी सरकारचा याच पावसाळी अधिवेशनात आणखी एक निर्णय गुंडाळला जाणार.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड पुन्हा एकदा थेट जनतेमधून होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने यापूर्वी या निर्णयाला स्थगिती देवून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत लागू केली होती. मात्र, नव्याने सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) सरकार आता हा नियम बदलण्याची शक्यता आहे. आता थेट सरपंच आणि नगराध्यक्षांचा निवड ही जनतेमधून होऊ शकते, असे स्पष्ट संकेत आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनातच याबाबतचा कायदा येण्याची शक्यता आहे.

२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट सरपंच आणि त्यापाठोपाठ थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय २०१५ मध्ये घेतला होता. या निर्णयांची तातडीने अंमलबजावणीही करण्यात आली होती. या निर्णयाचा भाजपला अनेक ठिकाणी फायदा झाला. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सन २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पुढाकाराने थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीला ब्रेक लावण्यात आला होता.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठे वादळ; YSR रेड्डींच्या जयंतीदिवशीच पक्षात फूट

पण आता राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. त्यानंतर लगेचच सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जावा अशी मागणी भाजपचे नेते, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली होती. नगराध्यक्ष, सरपंच सदस्यांमधून निवडला गेल्यास मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला वाव असतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाही अस्थिर बनतात. त्यामुळे नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेमधूनच व्हावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले होते.

आता पुढील ३ महिन्यांमध्ये राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ऑक्‍टोबरमध्ये राज्यातील १० हजारांवर ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकार याच पावसाळी अधिवेशनात सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
राज्य सरकारला दणका; OBC आरक्षणाशिवाय ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर

थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचे काही फायदे-तोटे समोर आले आहेत.

थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीचे फायदे

 • सरपंच, नगराध्यक्षांना अधिकार प्राप्त होऊन निर्णयप्रक्रिया वेगवान

 • सरपंच, नगराध्यक्ष स्वतःच्या वॉर्डाऐवजी गावचा विचार करू शकतो

 • सरपंच, नगराध्यक्ष निवडीतील घोडेबाजार थांबतो

 • सरपंच, नगराध्यक्ष पद प्रभावशाली

 • सरपंच, नगराध्यक्षांवर अविश्‍वास ठरावाच्या टांगत्या तलवारीला लगाम

थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीचे तोटे

 • सरपंच आणि नगराध्यक्ष एका गटाचा अन्‌ सदस्य दुसऱ्या गटाचे असे चित्र अनेक गावांत, शहरांत निर्माण झाल्याचे चित्र. त्याचा विकासकामांवर परिणाम झाल्याच्या तक्रारी.

 • एकत्रित कारभाराची परंपरा संपुष्टात येते.

 • काही ठिकाणी सरपंच, नगराध्यक्षांची एकाधिकारशाही सुरू झाल्याचेही चित्र होते.

 • पहिली अडीच वर्षे तर कायद्याचे संरक्षण असल्याने भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरपंचाला हटविणे किचकट.

 • बहुरंगी लढत झाल्यास ३० टक्के मते मिळविणाराही सरपंच, नगराध्यक्ष होऊ शकतो.

सदस्यांमधून सरपंच, नगराध्यक्ष निवडीचे फायदे

 • सरपंच आणि नगराध्यक्ष एका गटाचे असल्याने विकासकामांवर चालना मिळते.

 • एकत्रित कारभाराची परंपरा वाढीस लागते.

 • सरपंच, नगराध्यक्षांच्या एकाधिकारशाहीला लगाम राहतो.

 • भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरपंचाला हटविणे सोपे होते.

 • स्थानिक स्वराज्य संस्था स्थिर बनते.

थेट सभापती निवडीही शक्य?

राज्यातील ३५७ बाजार समित्या आहेत. त्यामध्ये सभापती निवडही थेट केली जाण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समिती कार्यक्षेत्रातील ७-१२ उतारा असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांतूनच सभापती निवडीचे धोरण जाहिर केले होते. मात्र त्याबाबत निर्णय घेतला नव्हता. हाही निर्णय घेणे शक्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in