ठरलं तर..! दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

लवकरच माझा शिंदे गटात प्रवेश होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Deepali Sayed
Deepali Sayed

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. मला एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आणलं. ते जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेल. लवकरच माझा शिंदे गटात प्रवेश होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आज सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानी म्हणजेच 'वर्षा' वर निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दिपाली सय्यद यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली होती. मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत थेट उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Deepali Sayed
महिलांचा अनादर करणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

मुंबई महानगर पालिकेतील खोके मातोश्रीवर जाणे बंद झाल्याचे सर्वात जास्त दु:ख रश्मी वहिनींना आहे. तर नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारे हे चिल्लर लोक आहेत. या सर्वांचा जो सर्वात मोठा दुवा आहे तो रश्मी वहिनी आहेत, अशी टीका दिपाली सदृय्यद यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी खासदास संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो. याचं संजय राऊत हे उत्तम उदाहरण आहे. अस सय्यद यांनी म्हटलं आहे.

राजकारणात येतो तेव्हा प्रत्येकजण स्वत चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी येत असतो. पण एखाद्या कारणांमुंळे पक्ष फुटीला गेला आहे. मग आपल्यालाही वाटतं ना, आपणही काम करायला पाहिजे, जे लोक बरोबर आहेत त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. दोन्ही गट एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला. पण कुठेतरी काहीतरी बिनसतंय जे एक पाऊल पुढे यायला पाहिजे होतं ते पडलं नाही, असही सय्यद यांनी म्हटलं आहे.

Deepali Sayed
एकनाथ शिंदे गटाला भाजपने दिले थेट आव्हान

अलीकडे सगळीकडेच खोके, खोके केलं जात आहे. त्या खोक्यांचं खरं राजकारण काय आहे, ते लोकांपर्यंत गेल पोहचलं पाहिजे, त्याचे मुख्य सुत्रधार कोण आहेत. मुंबई महापालिका कोणाच्या ताब्यात आहे तेही सर्वांना कळलं पाहिजे, त्याच्या मागे खरा सुत्रधार कोण आहे, तेही कळलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

याचवेळी त्यांना ठाकरे गट सोडण्याचे कारण विचारले असता, दिपाली सय्यद म्हणाल्या की, ही गद्दारी नाही, हा हक्क आहे, एक राजा असतो आणि त्याच्या आजूबाजूला सेनापती, सैनिक असतात, त्यांच्येही काही अधिकार असतात. त्यांच्यानंतर माझ्या पदरी काय पडणार आहे. पण तुम्ही फक्त हुलकावणी देणार असेल तर तसं नाही होतंं. अंसही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in