राणांच्या अडचणी वाढणार? गृहमंत्र्यांनी दिले कायदेशीर कारवाईचे संकेत

Navneet Rana | Ravi Rana | Dilip walse Patil : राणा दाम्पत्यांना अमरावतीमध्येच का थांबवले नाही, गृहमंत्र्यांनी सांगितले कारण...
राणांच्या अडचणी वाढणार? गृहमंत्र्यांनी दिले कायदेशीर कारवाईचे संकेत
ravi rana, navneet ranasarkarnama

मुंबई : मुंबई आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे, पण काही लोक राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असे भासवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत, असा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मोहित कंबोज (Mohit kamboj) यांच्याबाबतीत देखील घडलेली घटना दुर्देवी आहे, पण त्यावरुन मुंबई आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असे होत नाही. मात्र त्यांनी देखील काल विनाकारण खाली उतरुन चुकीचे वर्तन केले. त्यामुळे ती परिस्थिती उद्भवली आहे. याशिवाय विरोधी पक्षांकडून सातत्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी होतीय, पण ते इतके सोपे नाही. राज्यात परिस्थिती उत्तम आहे, असे म्हणत त्यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले.

वळसे पाटील पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वर्तन करावे. संविधानाच्या चौकटीत राहून आपल्यामुळे कोणत्याही प्रकारची तेढ वाढणार नाही, असे वर्तन करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. ज्याला हनुमान चालिसा वाचायची आहे, त्यांनी आपल्या घरात वाचावी. पण सरकारची बदनामी करण्यासाठी सर्व प्रकार सुरु आहे. याशिवाय हे पुढे केलेले प्यादे आहे. त्यांच्या एवढी हिंमत नाही, असाही हल्लाबोल वळसे पाटील यांनी यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर केला.

राणा यांना यापूर्वीच अमरावतीमध्ये नजरकैदेत का ठेवले नाही, असा सवाल विचारला असता ते म्हणाले, यापूर्वी देखील राणा यांना पोलिसांनी घरामध्ये नजरकैदेत ठेवले होते. तेव्हा त्यांनी लोकसभेमध्ये हक्कभंग आणून सर्व पोलिसांना दिल्लीला बोलावून घेतले होते. मात्र आता राणा यांनी नोटीस दिल्यानंतरही भूमिका बदलली नाही तर पोलिस कायदेशीर कारवाई करतील असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांना आणि शिवसैनिकांना परत पाठवण्याच्या सुचना पोलिसांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटला आहे. शिवसेना आणि शिवसैनिकांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मातोश्रीबाहेर जाणारच असा ठाम निर्धार अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी बोलून दाखवला आहे. राणा यांच्या या इशाऱ्यानंतर त्यांच्या शिवसेना अधिक आक्रमक झाली असून संतप्त शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.