वळसे-पाटलांचा इशारा; राज्यातील वातावरण बिघडवाल तर...

Dilip Walse-Patil| Maharasahtra| 'राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे
वळसे-पाटलांचा इशारा; राज्यातील वातावरण बिघडवाल तर...
Dilip Walse-Patil News Updates

मुंबई : ''राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे पण वातावरण बिघडणार नाही यासाठी राज्य सरकार काळजी घेत आहे. पण आम्हीदेखील पुर्ण तयारीत आहोत. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. पण कोणत्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे राज्यात सामाजिक तणाव, अशांतता निर्माण होत असेल तर, मग ती संघटना, व्यक्ती कोणीही असो त्याच्याव कारवाई केली जाईल,” असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांनी दिला आहे. (Dilip Walse-Patil News Updates)

मशिदींवरील भोंग्यांवरून मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत कठोर धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर भोंग्यांबाबत येत्या एक – दोन दिवसांत मार्गदर्शक नियमावली सादर केली जाणार असल्याचं सांगितलं. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं आहे.

Dilip Walse-Patil News Updates
'शिवतीर्थ'वर घडामोडींना वेग; पदाधिकाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे राज ठाकरेंचे आदेश

तसेच अमरावतीत काही घटक जास्त सक्रिय असल्याने तिथे तणाव निर्माण झाला होता. पण या जास्त सक्रिय घटकांचा बंदोबस्त करण्याची सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. काही घटकांकडून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण त्या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. आज पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. आम्ही त्यानंतर मुख्यमंत्री आणि सर्व गुप्तचर यंत्रणांशी बोलून परिस्थिती हाताळण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल,” असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

“पोलीस महासंचालक, आयुक्तांची बैठक होणार असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर निर्णय घेतला जाईल,” असंही त्यांनी सांगितलं,पण हे निर्णय घेताना परिणामांचाही विचार करायला हवा, असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केली. पण राज्य सरकार आपल्या राज्यातील जनतेच रक्षण कऱण्यासाठी सक्षम आहेत. पण केंद्र सरकारही सुरक्षा पूरवू शकते. आता त्या सुरक्षेचा वापर कशासाठी करायचा हे त्यांनीच ठरवावं”. असही वळसे पाटील यांनी नमुद केलं.

अलीकडे केंद्र सरकारडून राज्याच्या अधिकारांंना बाजूला सारुन काही दोषींना, व्यक्तींना सुरक्षा पुरवली जात आहे. पण केंद्रसरकारकडून राज्याचे अधिकार डावलून दोषींना, व्यक्तींना सुरक्षा हे हे राज्याच्या अधिकावर अतिक्रमण आहे. राज्य सरकार नियमानुसार व्यक्तीला सुरक्षा पुरवते तो राजकीय निर्णय नसतो. पण केंद्राकडून राज्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप सुरु असल्याचा आरोप दिलीप वळसे पाटलांनी केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्याच्या चर्चांवर वळसे पाटलांनी बोट ठेवले आहे. देशासमोर अनेक प्रश्न आहेत, केंद्रातील भाजप सरकारने देशातील महागाई, बेरोजगारी, सीमा सुरक्षेबाबत चर्चा करण्याऐवजी त्यावरुन जनतेचे लक्ष जाणीवपूर्वक दुसरीकडे वळवले जात आहे. असाही आरोप वळसे पाटील यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.