सुप्रिया सुळे, तटकरेंचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकले का ?

कोटा ठरविला आहे, त्यानुसार मतदान Voting होईल किंवा नाही, याची भिती असल्याने मतदान प्रक्रियेवर महाविकास आघाडीचे Mahavikas Aghadi प्रमुख नेते लक्ष ठेऊन आहेत.
Supriya Sule News, CM Udhav Thackeray News, Sunil Tatkare News, Vidhan Parishad Election 2022 News
Supriya Sule News, CM Udhav Thackeray News, Sunil Tatkare News, Vidhan Parishad Election 2022 Newssarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीला काही मतांचा कोटा गरजेचा आहे. त्याची जुळणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. शिवसेनेच्या आमदारांच्या मतदानापूर्वी ही भेट झाली असून मुख्यमंत्र्यांनी या दोघांचे म्हणणे ऐकले असेल काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (CM Udhav Thackeray News)

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू असून मते फुटू नयेत म्हणून महाविकास आघाडीतील तीनही पक्षात कोऑर्डिनेशन ठेवायला हवे, यातूनच सध्या भेटीचे सत्र सुरू आहे. खबरदारी व समन्वयाचा मुद्दा असल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. राष्ट्रवादीला मताचा कोटा आवश्यक आहे, त्यासाठीही नियोजन करण्यासाठी ही भेट होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर काय निर्णय घेतला असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Supriya Sule News, CM Udhav Thackeray News, Sunil Tatkare News, Vidhan Parishad Election 2022 News
विधान परिषद निवडणूक हरल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा द्यावा...

विधान परिषदेसाठी मतदानाचा प्राधान्यक्रम महाविकास आघाडीने ठरविलेला आहे. प्रथम राष्ट्रवादीचे आमदार मतदान करतील, त्यानंतर काँग्रेस व शेवटी शिवसेनेचे आमदार मतदान करणार आहेत. विधानभवनात प्रत्येक आमदाराला मतदानाबाबत व्यक्तीगत मार्गदर्शन केले जात आहे. त्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे मार्गदर्शन करत आहेत.

Supriya Sule News, CM Udhav Thackeray News, Sunil Tatkare News, Vidhan Parishad Election 2022 News
Video: राज्यात आणि देशात काही घडल तर पवार साहेबांवर टीका होते; रामराजे निंबाळक

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू असून महाविकास आघाडीतील तीनही पक्षात कोऑर्डिनेशन ठेवायला हवे, यातूनच सध्या भेटीचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. खबरदारी व समन्वयाचा मुद्दा असल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. राष्ट्रवादीला मताचा कोटा आवश्यक आहे, त्यासाठीही नियोजन करण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे.

Supriya Sule News, CM Udhav Thackeray News, Sunil Tatkare News, Vidhan Parishad Election 2022 News
विधान परिषद निवडणूक हरल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा द्यावा...

कोटा ठरविला आहे, त्यानुसार मतदान होईल किंवा नाही, याची भिती असल्याने मतदान प्रक्रियेवर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते लक्ष ठेऊन आहेत. मते बाद होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे. काँग्रेसच्या पाच पाच आमदारांना मतदानासाठी सोडले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com