आनंद दिघेंवर बाळासाहेब रागवायचे ; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'ती' आठवण

'आनंद दिघे हे 'झुकेंगा नही साला' असेच होते
आनंद दिघेंवर बाळासाहेब रागवायचे ; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'ती' आठवण
Balasaheb Thackeray, uddhav thackeray, anand dighe sarkarnama

मुंबई : "आनंद दिघे (anand dighe) हे नुसते शिवसैनिक नव्हते तर निष्ठा काय असते ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. त्यांचं निधन झालं तेव्हा ते ५० वर्षांचे होते. मात्र त्यांनी जे दिवसरात्र काम केलं आणि कार्यकर्ते घडवले ते पाहता त्यांनी १०० वर्षांचं काम केलं असंच म्हणावं लागेल. शिवसैनिकांचे डोळे आजही त्यांच्या आठवणीने ओलावतात...अशा अनेक आठवणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितल्या. (anand dighe news updates)

दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (dharmveer anand dighe movie) या सिनेमाचा ट्रेलर उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी लाँच झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

'आनंद दिघे हे 'झुकेंगा नही साला' असेच होते, हिंम्मत असेल तर समोर या. हिंमत असेल तर टक्कर दे. असेच होते. बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेले आनंद दिघे होते, त्यांचा माणूस आणि शिवसैनिक पुन्हा होणे नाही,असे मुख्यमंत्री म्हणाले.

'आनंद दिघे यांचं नाव घेतल्यावर सगळे दिवस आठवतात.. बाळासाहेब हे आनंद दिघे यांच्यावर रागवले असायचे. ही परंपरा ठाणेकरांनी राखली आहे. सकाळी ११ ची वेळ दिली. किती वाजता यायचे तेव्हा ११ वाजलेले असायचे. बाळासाहेब ठाकरे हे वेळ पाळणारे होते. आनंद दिघे यांना सकाळची ११ ची वेळ दिले असेल तर २ वाजेपर्यंत त्यांचा काही पत्ता नसायचा. मग २ वाजता यायचे तोपर्यंत बाळासाहेब चिडलेले असायचे. हा गंमतीचा भाग वेगळा पण बाळासाहेबांसमोर उभे असल्यावर एका शब्दांने बोलायचे नाही. समोर आल्यानंतर राग वाहून जायचा आणि ते प्रेम पाहण्यास मिळालं' अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.


 Balasaheb Thackeray, uddhav thackeray, anand dighe
आढळरावांच्या 'होम स्पीच' वर राष्ट्रवादीच्या नेत्याची तुफान फटकेबाजी ; चर्चांना उधाण

"शिवसेना हा गुरू शिष्याचं नातं जपणारा एकमेव पक्ष आहे. त्यामुळेच शिवसेना संपवण्याचे प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केले त्या सगळ्यांना संपवून हा पक्ष पुढे गेला आहे. आनंद दिघेंच्या आयुष्यावर आलेला हा सिनेमा फक्त सिनेमा किंवा मनोरंजन म्हणून पाहू नका तर कडवट निष्ठा काय असते ते अनुभवण्यासाठी हा सिनेमा पाहा," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


 Balasaheb Thackeray, uddhav thackeray, anand dighe
महाविकास आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार ? उद्धव ठाकरे की शरद पवार..

"सिनेमाचा ट्रेलर पाहिला तेव्हा शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरू आणि शिक्ष असं हे नातं जपणार हा एकमेव पक्ष असणार आहे. आणि ही भावना असल्यामुळे अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांना संपवून शिवसैनिक पुढे गेली," असे शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.