Dhananjay Munde News: "समाज माझ्यावर थुंकत होता, 'धन्या'शिवाय बोलत नव्हता.." ; धनंजय मुंडे भावूक!

Dhananjay Munde Emotional : समाज बांधवासमोर धनंजय मुंडे झाले भावूक
Dhananjay Munde :
Dhananjay Munde :Sarkarnama

Dhananjay Munde : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात मोठे व्हावे अशी माझ्या वडिलांची व माझी महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी माझे वडील चंदनासारखे झिजत राहीले. मधल्या काळात घरातून वेगळे झाल्यानंतर विचारधारेतून ही वेगळं व्हावे लागले. विचारधारेतून मी वेगळो झालो नाही, तर मला वेगळं केले गेले. ज्यावेळी समाज माझ्यावर थुंकत होता... समाज धन्या शिवाय बोलत नव्हंता... हा समाज मला शिव्या दिल्या शिवाय रहात नव्हता, हा संघर्ष मी पाहीला आहे असे म्हणत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे समाजासमोर आपल्या संघर्षाच्याआठवणींनी भावूक झाले.

संघर्षातून उभारी घेण्यास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी माझा दृष्टीकोन साफ होता, माझी नियत साफ होती, त्यामुळे शेवटी शेवटी का होईना या धन्याचा धनुभाऊ झाला, असा टोला त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांना लगावला.

Dhananjay Munde :
Budget Session News: 'शाळेतला पहिला दिवस असल्याची भावना' : काय म्हणाले सत्यजीत तांबे?

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती(Akhil Maharashtra Vanjari Seva Samiti) यांच्या 35 व्या वर्धापन दिन सोहळ्यास माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे रविवारी कल्याण मध्ये उपस्थित होते. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांचा मुंडे यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सन्मान करण्यापूर्वी मुंडे यांनी दराडे यांना स्वतः फेटा बांधला त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

समाजाला प्रबोधन करताना मुंडे यांनी आपला संघर्ष समाजासमोर मांडताना वरील विधान केले. भगवान गडावरच्या आठवणींही त्यांनी जाग्या केल्या. भगवान गडावर भक्त म्हणून गेलेला विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, दगड खाणारा हा मुंडे आहे. परंतु नियतीवर मला विश्वास होता. त्यावेळी गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांना मी सांगितले होते की, बाबा न्याय करतील. जोपर्यंत आपण या ठिकाणी मला निमंत्रित करणार नाही तोपर्यंत भक्त म्हणून सुद्धा या गडावर मी दर्शनासाठी येणार नाही. आज शास्त्री बाबांच्या कृपार्शिवादानेच जिथे मी दगड खाल्ले त्या गडाचा दगड मला होता आहे. कोणत्याही सत्कारापेक्षा त्या गडाचा दगड होणे ही बाब माझ्यासाठी महत्त्वाची होती असे मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde :
Mla Saroj Ahire : अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन आलेल्या सरोज अहिरे यांना हिरकणी कक्ष पाहून अश्रू अनावर

पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव दराडे यांच्या कामाचे मुंडे यांनी कौतुक केले. " मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना, ज्या व्यक्तीने त्याठिकाणी प्रधान सचिव म्हणून जबाबदारी घ्यायची होती. त्या व्यक्तीला सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्ताची जबाबदारी दिली जाते. त्यावेळेस ज्या वेदना होतात त्या वेदना दराडे साहेब मी माझ्या आयुष्यात पंधरा वर्षे सहन केल्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उशीरा का होईना समाजाने माझी किंमत केली :

अखिल महाराष्ट्र वंजारी समाज समितीच्या माध्यमातून गोपिनाथ मुंडे, पंकजा मुंडे येथे आल्या त्यांनी तुम्हाला जे काही शब्द दिले ते काही पूर्ण झाले असतील, काही अपूर्ण राहीले असतील. आज माझ्याकडून एक समाज बांधव म्हणून आपण ज्या अपेक्षा ठेवल्यात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी मी झाल्या खांद्यावर घेतो, असा शब्द यावेळी मुंडे यांनी समाजाला दिला. शब्द देताना समाजाला उद्देशून बोलताना ते म्हणाले, उशीरा का होईना तुम्ही माझी किंमत केली. मी एवढी तरी किंमत कमवली की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मला तुम्ही सांगू शकाल. शेवट का होईना या कार्यक्रमाला माझ्यासारख्याला आपल्याला बोलवावं लागते हे स्वकतृत्वाने माझ्यासारख्याने केले आहे.

Dhananjay Munde :
Milind Narvekar News: मिलिंद नार्वेकर चुकले : आदित्य ठाकरेंनी चूक लक्षात आणून देताच, म्हणाले...

जातीतून नाही तर स्वकर्तृत्वाने माणूस मोठा होतो :

माझ्या जीवनात माझ्या वडिलांची मला शिकवण आहे. जात पात धर्म कधी माझ्या अंगाला शिवला नाही. ज्या जातीत जन्माला येतो त्या जातीचा म्हणून काम करणे हे कर्तव्य पण जातीत जन्माला येत असताना अनेक जाती धर्माचे पुण्य आपल्याला मिळते ते सगळ्यात मोठे पुण्य, ते आपल्याला करायचे आहे. मनुष्य हा आपल्या कामातून, कार्यातून, कर्तृत्वातून मोठा होतो...जातीतून नाही... याची जाणीव सर्वांनी ठेवा. जातीत जन्माला येण म्हणजे मोठा होण असे नाही. आपल कर्तृत्व दाखवाव लागत आणि त्यावेळेस जातीला सुद्धा ओळख पटते की हा माणूस मोठा झाला आहे असे मुंडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com