क्युंकी आपकी पहचान एक 'योद्धा' है! मुंडेंच्या शायरीतून पवारांना सदिच्छा

पवारांच्या प्रकृतीबाबत अनेकांनी काळजी व्यक्त करत लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
Sharad Pawar, Dhananjay Munde
Sharad Pawar, Dhananjay Mundesarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पवार यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे. त्यानंतर पवारांच्या प्रकृतीबाबत अनेकांनी काळजी व्यक्त करत लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Sharad Pawar, Dhananjay Munde
आजोबांना कोरोनाचा संसर्ग होताच नातू रोहित पवार यांची भावनिक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्वीट करत पवार यांना सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक शेरही लिहिला आहे. चल रहा युद्ध हो, वक्त भी विरुद्ध हो। फिर भी आपको लढना है, क्युंकी आपकी पहचान एक 'योद्धा' है। पवार साहेब, लवकर बरे व्हा; काळजी घ्या!! असे मुंडे यांनी म्हटले आहे.

सोमवारी शरद पवार यांची कोविड (Kovid-19) चाचणी पॉझिटिव्ह आली. याबाबत पवार यांनी ट्विट करून माहिती दिली. 'माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी,' असे पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Sharad Pawar, Dhananjay Munde
बहुतांश नेते कोरोनाबाधित होत असताना शरद पवारांनी दोन वर्षे असं चकवलं होतं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवारांची फोनवरून विचारपूस केली आहे. याबाबत पवारांनी ट्विट करत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी फोन करून आपल्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांची काळजी आणि सदिच्छांबाबत मी आभारी आहे, असे पवारांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यातील अनेक आमदार व मंत्र्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com