मुंडेंना हृदयविकाराचा झटका नव्हेच; राजेश टोपेंनी सांगितले खरे कारण

Dhananjay munde| Breach Candy Hospital : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात मुंडेंना बेशुद्ध झाले होते
Dhananjay munde| rajesh tope
Dhananjay munde| rajesh topesarkarnama

मुंबई : 'मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांना हृदयविकाराचा (Heart attack) झटका आला नाही. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवासामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे. काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील,'' अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) दिली आहे. '

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना मुंबईच्या ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याच्या अफवाही समाज माध्यमांवर पसरल्या होत्या. सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटतं होते. त्यानंतर सायंकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dhananjay munde| rajesh tope
राऊतांना लवंडे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना एका वाक्यात प्रत्युत्तर!

याबाबत राजेश टोपे यांनी त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात मुंडेंना बेशुद्ध झाले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी केलेल्या उपचारानंतर त्यांना बरे वाटत आहे. त्यांची प्रकृतीही उत्तम असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडेंना सध्या आराम करण्यास सांगितला आहे. त्यामुळे नागरिकांनी मुंडेना भेटायला येऊ नये, तिथूनच शुभेच्छा द्याव्यात, असेही मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ब्रीचकँडी रुग्णालयात जाऊन राज्याचे धनंजय मुंडे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अजित पवार यांनी मुंडेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून तब्येतीची माहिती घेतली.

दरम्यान, यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार चांगलेच संतापले, अशा लोकांना जास्त महत्व देऊ नका, मी सध्या धनंजय मुंडे यांना भेटायला आलोय. राज्यात इतरही महत्वाचे विषय आहेत, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com