धनंजय मुंडेंनी मध्यरात्री घेतली फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास खलबतं!

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली.
Devendra Fadnavis News, Dhananjay Munde News
Devendra Fadnavis News, Dhananjay Munde NewsSarkarnama

मुंबई : राज्याच्या राजकारणातील धक्के काही केल्या थांबायला तयार नाहीत. कारण, माजी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंंडे (Dhananjay Munde) यांनी गुरुवारी (ता. ३० जून) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. मुंडे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचप्रमाणे त्यांचे फडणवीस यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Dhananjay Munde meet Devendra Fadnavis at midnight)

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर येईल, असा राजकीय धुरिणींचा कयास होता. मात्र, भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्या नावाची घोषणा फडणवीस यांनाच करावी लागली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी गेली काही वर्षे फडणवीस हे जंगजंग पछाडत होते. त्यातूनच त्यांनी शिंदेंना गळाला लावले होते. शिंदे यांच्या बंडानंतर फडणवीस मुख्यमंत्री बनणार हे निश्चित होते. मात्र, पक्षनेतृत्वाच्या ऐनवेळच्या भूमिकेमुळे त्यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली. हे सर्व राज्याला बुचकळ्यात पाडणारे होते.(Dhananjay Munde News)

Devendra Fadnavis News, Dhananjay Munde News
एकनाथ शिंदेंच्या विरोधात आंदोलन करणारे शिवसैनिक पडले बुचकळ्यात !

फडणवीसांनी शिंदे यांच्या नावाची घोषण करताना आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराज देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला भाग पाडले. त्यांच्या ट्विटर हॅंडलवरसुद्धा त्यांनी आपल्या पदाचा उल्लेख केलेला नाही. फडणवीसांना एकाकी बॅकफूटवर जावे लागल्यामुळे भाजपमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे शपथविधीनंतर ना नागपुरात जल्लोष झाला ना मुंबईत.

Devendra Fadnavis News, Dhananjay Munde News
मोदींनी दोनवेळा फोन केल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री बनण्यास तयार!

फडणवीस यांचे धनंजय मुंडे यांच्याशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यातूनच नाराज फडणवीस यांची मुंडे यांनी गुरुवारी मध्यरात्री सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास खलबतं झाली आहेत. त्याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. मात्र मुंडे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात, त्याच प्रमाणे फडणवीसांच्या ‘गुडफेथ’मधील मानले जातात. त्यामुळे नाराज फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Devendra Fadnavis News, Dhananjay Munde News
एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत पवारांनी उद्धव ठाकरेंना चार वेळा अलर्ट केले होते....

यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपास यांनी या एका वृत्तवाहिनीशी बोलताना धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले असावेत, असा दावा केला आहे. मुंडे-फडणवीस यांच्या भेटीत उद्याच्या राजकारणाची काही बीजे तर रोवली गेली नाहीत ना, अशी चर्चाही आज सकाळपासून राज्यात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com