राज्यसभेच्या उमेदवारीवरुन धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

Rajya Sabha| Pankaja Munde latest news| भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
Pankaja Munde News, Dhananjay Munde News
Pankaja Munde News, Dhananjay Munde NewsSarkarnama

मुंबई: भाजपकडून (BJP) राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारांची घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र यात पंकजा मुंडे यांचं नाव नसल्याने त्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Dhananjay Munde News in Marathi)

पंकजा मुंडे म्हणाल्या...

विधान परिषेदबाबत मला कोणतीही इच्छा नाही आता पक्ष योग्य तो निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच, राज्यसभेसाठी माझ नाव चर्चेत नाही पण ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्यासाठी मला आनंद आहे. पियुषजींना उमेदवारी मिळण अपेक्षित होतं आणि त्यांना ती मिळाली. विदर्भात अनिल बोंडेंना संधी मिळाली, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याची संधी मिळाली त्यांनाही माझ्या शुभेच्छा. अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. देंवेद्र फडणवीस म्हणाले होते पंकजा मुंडे सर्व जागांसाठी पात्र आहेत असे विचारले असता, मी जिथे आहे तिथही माझं चांगलच सुरु आहे, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं.

Pankaja Munde News, Dhananjay Munde News
संजय राऊत दीड तास ट्राफिकमध्ये अडकले अन्...

दरम्यान, या मुद्द्यावरुन आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंंजय मुंडे यांनी पंकजांवर निशाणा साधला आहे. पात्र असण आणि जबाबदारी देणं यातलं जे अंतर आहे ते अडचणीचं ठरु नये अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी पंकजांना टोला लगावला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत मोर्शी मतदार संघातून डॉ. बोंडे यांचा पराभव झाला. पण स्वस्थ न बसता त्यांनी जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व आंदोलनात, कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय राहिले. भाजपने विदर्भात कुणबी, मराठा समाजाला जनाधार मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचीच पक्षाने परतफेड म्हणून डॉ. बोंडे यांना ही उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com