महाविकास आघाडीची 9 मते फुटली : धनंजय महाडिक यांचा विजय

BJP | Rajya Sabha Election : संजय पवार यांचा पराभव; फडणवीसांची खेळी यशस्वी
Dhananjay Mahadik, Sanjay Pawar Latest Marathi News
Dhananjay Mahadik, Sanjay Pawar Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षीत राज्यसभा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. यात पहिल्या फेरीत ५ उमेदवार विजयी झाले आहेत. यात शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांचा समावेश आहे. तर सहाव्या जागेसाठी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक अशी चुरस सुरु झालेली आहे.

पहिल्या फेरीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये संजय राऊत यांना ४१ मत मिळाली. प्रफुल्ल पटेल यांना ४३, इम्रान प्रतापगढी यांना ४४ मत मिळाली. तर पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मत मिळाली आहेत. तर पहिल्या फेरीमध्ये धनंजय महाडिक यांना २७ मत मिळाली आहेत आणि पवार यांना ३३ मत मिळाली आहेत.

प्रथमतः दिसणाऱ्या आकडेवारीनुसार भाजपला असणाऱ्या पहिल्या पसंतीच्या मतामध्ये १२३ मत मिळाली आहेत. जी किमान ९ मत जास्त मिळाली आहेत. ही सर्व मत महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांची आहेत. भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची मत जास्त असल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकावर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेचे संजय पवार पराभव झाला आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com