शिवसेना पडली बाजूला अन् मराठा संघटनांच्या हिट लिस्टवर आले संजय राऊत!

मराठा संघटना आक्रमक, संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्याची मागणी
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama

मुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभेसाठी शिवसेना पाठिंबा देणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यानरुन आता मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. संघटनांनी शिवसेनेला (ShivSena) निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशाराही दिला आहे.

छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) म्हणाले, शिवसेना छत्रपतींसोबत जो अटी शर्थींचा खेळ खेळत आहे. हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. तसेच शिवसेनेव्यक्तिरिक्त बाकी पक्ष जी बघ्याची भूमिका घेत आहेत ते ही महाराष्ट्राला व आम्हाला आवडलेले नाही. त्यामुळे शिवसेनेने तात्काळ पाठिंबा जाहीर करावा, नाहीतर मतांची बेरीज कशी गोळा करायची हे आम्हाला चांगलेच जमते, असेही ते म्हणाले.

Sanjay Raut
'संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्यास ठाकरे, अजितदादा आणि थोरातांच्या घरात घुसणार'

शिवसेनेने या आधी अनेकांना खासदारकी देताना शिवसेनेत प्रवेश करणे सक्तीचे केले होते का? किंवा शिवबंधन बांधले होते का? मग आता संभाजीराजेंनाच अशी अटका का, असे सवाल त्यांनी केले. मात्र, शिवसेनेला छत्रपतींसोबत न्याय करायचा नसेल तर आमच्या मतांवर पुढच्या वेळी तुमचे आमदार निवडून येतात कसे हे आम्ही पाहू. 42 मतांचा आकड्याची जुळवाजुळव आम्ही सुरू केली आहे. पाच सहा मते कमी आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तसचे राज्यसभेच्या ६ व्या जागेच्या बाबतीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाक खुपसू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब सकारात्मक आहेत, असेही जाधव यांनी सांगितले. त्यामुळे संजय राऊत तुम्हाला किंमत चुकवावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, संजय राऊत मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, शिवसेना एक कडवट मावळा राज्यसभेत पाठवणार आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय आता संपला आहे. शिवसेना आता संभाजीराजे यांच्या ऐवजी संजय पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे फायनल झाले आहे. संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकर होईल, असेही राऊत यांनी सांगितले. त्यामुळे मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut
उमेदवारी अन् छत्रपतींच्या सन्मानाचा संबंध नाही! मुनगुंटीवारांच्या गुगलीनं चर्चेला उधाण

संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला प्रतिसाद न दिल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित केला आहे. सुरूवातीला ज्येष्ठ नेत्यांना या जागेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण कोल्हापूरातीलच संजय पवार हे नाव अचानक चर्चेत आले होते. संजय पवार हे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित असलेले पवार हे मागील 25 ते 30 वर्षांपासून पक्षात सक्रीय आहेत. एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांकडे पाहिले जाते. कोल्हापूर महापालिकेत ते नगरसेवकही होते. मराठा उमेदवार देऊन शिवसेनेने समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com