
DhairySheel Patil : शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश झाला आहे. यामुळे शेकापचा चर्चेतील चेहरा भाजपने टिपला, अशी चर्चा होत आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, "मी स्वत: 2014 साली हा प्रयत्न करून पाहिला, पण तेव्हा माझा हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. मला साऱखं वाटायाचा की, हा आपला धडाडीचा नेता, आपला मित्र आपल्या सोबत असला पाहिजे. विधानसभेत मला धैर्य़शील पाटील यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. ध्येयाने प्रेरित असलेलं हे कुटुंब आहे. केवळ राजतकारण करणारे लोक नाहीत. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते राजकारण करतात. मी सभागृहात नेहमी त्यांच्यासोबत एकत्र बसलो. आपले प्रश्न अत्यंत धडाडीने ते मांडायचे. "
"मी मुख्यमंत्री असताना ते नेहमी माझ्याकडे यायचे, माझ्या परिने मी काही गोष्टी सोडवायचा प्रयत्न करायचो, असा माणूस भाजपमध्ये असला पाहिजे, कारण- तळागाळातल्या माणसाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान मोदीजी आहेत. आणि आज धैर्य़शीलजी जरी पक्ष बदलत जरी असले, तरी ते त्यांचा विचार बदललेले नाही. त्यांचा जे विचार आहे, कष्टकरी, वंचित, शेतकरी यांच्या विकासाचं कार्य मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही करत आहोत. अतिशय योग्य निर्णय आपण घेतलात," असे फडणवीस म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.