Devendra Fadnvavis : सावरकरांच्या अपमानावर मूग गिळून गप्प : आता कोणती मजबुरी? ; फडणवीसांचा ठाकरेंना सवाल!

Devendra Fadnvavis : "मागच्या वेळी तुम्हाला सरकार चालवायचं होतं, आता कोणती मजबूरी?"
Devendra Fadnvavis : Uddhav Thacketay
Devendra Fadnvavis : Uddhav ThacketaySarkarnama

Devendra Fadnvavis : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी फडणवीसांनी काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

फडणवीस म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचं काम राहुल गांधींनी केलं आहे. मागच्या काळात तुमची मजबूरी होती, तुम्हाला सरकार चालवायचं होतं. रोज राहुल गांधी सावरकरांचा अपमान करायचे, तरी तुम्ही मूग गिळून गप्प बसायचा, आता तुमची मजबुरी काय? तुम्ही ज्यांचे गळाभेटी घेता, ते रोज सावरकारांचा अवमान करतात. आम्ही या ठिकाणी राहुल गांधींचा निषेध करतो," असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला

Devendra Fadnvavis : Uddhav Thacketay
Devendra Fadanvis News : छत्रपती संभाजीनगर, धाराशीवची अधिसूचना आज किंवा उद्या..

फडणवीस पुढे म्हणाले, "उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. चार आठवड्यांचा कालावधी या अधिवेशनासाठी निश्चित केला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या चर्चासाठी सरकार तयार आहे. विधान परिषेदेत तीन विधयेके प्रलंबित आहेत. आणखी हा सात विधेयके प्रस्तावित आहेत. यामध्ये विशेषत: लोकआयुक्तांच्या संदर्भातलं विधेयक मंजूर करण्याबाबत आमचा आग्रह असेल. सर्व पक्षांनी लोकायुक्तांच्या विधेयकाला मदत करावी."

Devendra Fadnvavis : Uddhav Thacketay
Pune by poll Election : सायंकाळी पाच वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 41.1 तर कसब्यात 45.25 टक्के मतदान

"आर्थिक सर्वेक्षाणाचा अहवाल सरकारकडून मांडण्यात येणार आहे. ९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मात्र आज चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. पण आमची अपेक्षा आहे, त्यांनी तो वाचावा,समजून घ्यावा, त्यानंतरच त्यांनी आपली प्रतिक्रियी द्यावी, असे ही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com