...पण तुम्ही ‘गधा’दारी नक्की आहात : फडणवीसांची ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका

हिंदुत्वाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
Devendra Fadnavis & Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : ‘हे कुठले घंटाधारी हिंदुत्ववादी...घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना हिंदुत्व शिकवू नये. आमचे हिंदुत्व हे गदाधारी आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला होता. त्याला आज (ता. २६ एप्रिल) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेलक्या शब्दांत उत्तर दिले आहे. (Devendra Fadnavis's reply to Uddhav Thackeray's criticism on issue of Hindutva)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जीवनपट उलघडून दाखविणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (ता. २६ एप्रिल) मुंबईत करण्यात आले. त्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. काही लोकांना हिंदुत्व असण्याची लाज वाटते. आता तर नवं हिंदुत्व आले आहे. ते म्हणजे घंटाधारी आणि गदाधारी. तुम्ही घंटाधारी आणि गदाधारी हिंदुत्ववादी आहात की नाही, हे माहीत नाही; पण रोज टीव्ही लावल्यानंतर कळते तुम्ही गधादारी (गाढव) नक्कीच आहात, अशा शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणाचा समाचार घेतला.

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
हर्षवर्धन पाटलांच्या खंद्या समर्थकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

फडणवीस म्हणाले की, भाजपच्या वाटचालीत अमित शहा यांचे पर्व आहे, हे पुस्तक त्याचा आलेख आहे. या पुस्तकाने त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेतला आहे. मोदी हे रत्नपारखी आहेत, त्यांनीच हा हिरा शोधून काढला. गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी गुजरातमधील ‘क्राईम रेट’ कमी केला. माफिया राज चालवत होते, त्यांना वठणीवर आणण्याचे काम अमित शहा यांनी केले आणि जे वठणीवर येत नव्हते, त्यांचा एन्काऊंटर केला.

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
मित्राच्या मुलाच्या घरी स्नेहभोजन घेत नितीन गडकरींनी जपली मैत्री!

गुजरातमध्ये 19 एन्काऊंटर झाले. ते दाखवले गेले आणि अमित शहांना कारागृहात टाकले. त्यांना गुजरातच्या बाहेर राहायला भाग पाडले, त्यावेळी दिल्लीत राहत असताना अमित शहा यांनी भारतभ्रमण केले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे संघटन कमकुवत झाले होते. तेथील तेव्हाच्या नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचे सोडून दिले होते. पण, अमित शहा हे तिकडे गेले, त्यांनी सर्व पाहणी केली आणि सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. त्या परिणाम २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या, असे फडणवीस यांनी नमूद केले.

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
मुंबईत मराठी माणसांना केंद्राच्या आदेशाने गोळ्या घालणार, असा त्याचा अर्थ! : राऊत संतापले!

ते म्हणाले की, अमित शहा यांनी मराठ्याच्या इतिहासाबद्दल एक पुस्तक लिहिले आहे. त्याबाबतचे संदर्भ शोधण्यासाठी ते लंडनपर्यंत गेले होते. त्यामुळे ते मराठ्याच्या इतिहासावर तीन ते साडेतीन तास बोलू शकतात. ते एकदा लता मंगेशकर यांच्यासोबत तब्बल एक तास त्यांच्या विविध गाण्यांबाबत बोलत होते. ते उत्तम तबलावादकही आहेत.

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेची रणनीती पुण्यात ठरली!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

देवळात घंटा बडवणारे हिंदू मला नको आहेत, तर तो अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायाचे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी. घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना हिंदुत्व शिकवायला जाऊ नये. आमचे हिंदुत्व हे गदाधारी आहे. काही तकलादू, नकली हिंदुत्ववादी आले आहेत. ‘तेरी कमीज मेरी कमीज से भगवी कैसे’ हा त्यांचा पोटशूळ आहे. या सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला एकदा लावूनच टाकायचा आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com