मविआच्या पत्त्यांचा बंगला दहा तारखेला हलला; आता 'वीस'ला कोसळणार!

आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचा Devendra Fadnavis विश्वास
Devendra Fadnavis Latest Marathi News
Devendra Fadnavis Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीमुळे (Legislative Council election) राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. सध्या सर्वच पक्षांनी आप-आपल्या आमदारांना हॅाटेलमध्ये ठेवलेल आहे. भाजपने (BJP) ताज हॅाटेलमध्ये आमदारांना ठेवले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बैठकीमध्ये आमदारांचे अभिनंदन केले. (Legislative Council election Latest Marathi News)

यावेळी फडणवीस म्हणाले, ज्या प्रमाणे राज्यसभेला तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे १० तारखेला महाविकास आघाडीच्या पत्त्यांचा बंगला हलला. आता २० तारखेला आपले पाचही उमेदवार निवडून आणल्यास महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला कोसळेल, असा विश्वास आमदारांना फडणवीसांनी दिला.

Devendra Fadnavis Latest Marathi News
होय, आम्ही शिवसेना समर्थक आमदारांना संपर्क केला : अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना दिली कबुली

काही भाजप आमदार मुंबईत येणे बाकी आहे. त्यांना लवकरात लवकर पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात रविवारी सर्व आमदारांना ४ वाजता फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. भाजपसाठी अवघड वाटणारी राज्यसभा निवडणुक फडणवीसांच्या रणनितीमुळे जिंकली. तसाच काहीसा चमत्कार विधान परिषद निवडणुकीतही फडणवीसांना करावा लागणार आहे.

Devendra Fadnavis Latest Marathi News
विधानपरिषद निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा दबाव; आमदारांना थेट फोन !

त्या नुसार ते उद्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपने ५ आणि महाविकास आघाडीने ६ उमेदवार दिले आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. जगताप यांना १० मतांची तर लाड यांना तब्बल २२ मतांची जुळवा जुळव करावी लागणार आहे. त्यामुळे फडणवीसांचे कसब पणाला लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com