फडणवीस यांचा `बूस्टर डोस` दहा हजार बूथप्रमुखांना `चार्ज` करणार

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी (BMC) भाजपची आक्रमक रणनीती
फडणवीस यांचा `बूस्टर डोस` दहा हजार बूथप्रमुखांना `चार्ज` करणार
Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सभा घेत असतानाच भाजपनेही मुंबईत बुस्टर डोस सभेचे आयोजन केले आहे.

मुंबईतील सर्व बुथप्रमुखांना या सभेचे आमंत्रण देण्यात आले आहे सुमारे १० हजार कार्यकर्ते या वेळी हजर असतील. भाजपने आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. मुंबईत शिवसेनेला हरवत महापौर करणे अत्यंत आवश्यक असल्याने भाजप या महानगरात संपूर्ण ताकद लावण्याचे प्रयत्न अशा सभांच्या माध्यमांतून होत आहेत.

Devendra Fadnavis
आघाडी सरकार पडून वर्षभरात फडणवीस मुख्यमंत्री! चंद्रकांतदादांचं मोठं भाकीत

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारी ही सभा त्यामुळेच भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. मुंबईत चोहोबाजुंनी शक्ती एकत्रित करण्याचा प्रयोग भाजप आगामी काळात निश्चितपणे करणार आहे. मुंबई महानगरातील बूथनिहाय रचना महापालिका जिंकण्यासाठीचा सर्वात महत्वाचे काम आहे. या सभेद्वारे त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. बूथप्रमुखांना चार्ज करण्याचे काम या सभेत होणार आहे. शिवसेनेच्या पालिकेतील कारभाराच्या विरोधात भाजपने पोल खोल सभा शहरभर घेतल्या. त्यावरून शिवसेनेशी मोठा संघर्ष करावा लागला. शिवसेनेच्या विरोधाच्या भूमिकेबद्दलही या सभेत फडणवीस जाब विचारण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis
राज ठाकरेंच्या उत्तर सभेनंतर आता देवेंद्र फडणवीस घेणार बूस्टर डोस सभा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी बुथरचना बळकट करण्यासाठी देशभर मोठे अभियान हाती घेतले आहे. त्यात हे शहर मागे राहू नये, यासाठी पक्षाचे शहारध्यक्ष मंगलप्रसाद लोढा यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे या सभेच्या यशस्वीतेसाठी ते झटत आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकणे हा भाजपसाठी फार मोठा प्रयोग असेल असे मुंबई शहरप्रमुख मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात त्या दिशेने पावले टाकली जात असून मुंबई आमची हे दाखवण्यासाठी भाजपची चमू सज्ज झाली असल्याचा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.