फडणवीस मुंबई महापालिकेच्या या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

सरकारी रुग्णालयात उपचार घेणारेफडणवीस हे एकमेवराजकीय नेते....
devendra fadnavis.jpg
devendra fadnavis.jpg

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोनावरील उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची तब्येत उत्तम असून केवळ विलगीकरणासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचे मित्रही मुंबईत पोहचत आहेत.

फडणवीस यांना कोरोना झाल्याचे कळताच माजी मंत्री गिरीश महाजन जळगाव विमानतळावरून विशेष विमानाने मुंबई येथे रवाना झाले. लाॅकडाऊन लागू झाल्यापासून फडणवीस सातत्याने फिरत आहेत. गेल्या या आठवड्यात ते बिहारमधून महाराष्ट्रात पूरपाहणीसाठी सोमवारी आले होतो. बुधवारपर्यंत पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर ते गुरूवारी तातडीने बिहारला रवाना झाले. तेथेच त्यांना लागण झाली. बिहारमधील भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी, राजीप्रताप रूड, शहानवाझ हुसेन हे पण कोरोनामुळे प्रचारापासून दूर राहिले. त्यात आता फडणवीस यांनाही सक्तीने आराम करावा लागला आहे.

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणतात की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

फडणवीस हे लाॅकडाऊन काळात राज्यात फिरत असताना सरकारी रुग्णालयांची अवस्था पाहून अस्वस्थ झाले होते. तेथील रुग्णांचे हाल पाहून त्यांनी सरकावर कोरडे ओढले होते. याच काळात आपले मित्र गिरीश महाजन यांच्याकडे त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. गिरीश, मला चुकून कोरोना झाला तर मला सरकारी रुग्णालयातच अॅडमिट करा, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातील अनेक मंत्री, नेते हे कोरोनाने आजारी पडली होती. मात्र कोणीही सरकारी रुग्णालयात उपचार न घेता पंचतारांकीत रुग्णालयात जाणे पसंत केले. फडणवीस यांची याउलट भूमिका होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com