Devendra Fadnavis News : फडणवीसांची ठाकरे गटावर बोचरी टीका; म्हणाले, "तीन-चार लोकांमुळे..."

Uddhav Thackeray : मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Politics : राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजप-शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता राज्यातील सत्तास्थापनेच्या वर्षभरानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होताना दिसत नाही. त्यामुळे सत्ताधारी आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्यावर बोलतना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Cabinet Expansion) सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शिंदे गटासह भाजपमधीलही काही आमदार गुडघ्याला बांशिंग बांधून बसल्याचे दिसून येत आहे. यात काही अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अनेकांना आशा होती. ती मात्र फोल ठरली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांतील २२ आमदार अस्वस्थ झाले आहेत. त्यातील काही ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात असल्याचाही दावा केला ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर फडणवीसांनी ठाकरे गटाचा चांगलाच समाचार घेतला.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Fadnavis-Thackeray Meet: राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीत कोणती चर्चा झाली; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, "आजच्या घडीला ठाकरे गटाइतका कुठलाही पक्ष असंतुष्ट नाही. ठाकरे गटातील तीन-चार जण इतके असंतुष्ट आहेत की त्यांच्यामुळेच संपूर्ण गटात अस्वस्थता पसरली आहे. पोपट मेलाय हे सर्वांना माहिती आहे. मात्र कार्यकर्त्यांतील उत्साह वाढविण्यासाठी ठाकरे गटाकडून सतत अशी वक्तव्य केली जात आहेत. येत्या काही दिवसांत समजेल की कुठल्या गटात जास्त अस्वस्थता आहे."

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Ram Shinde & Rohit Pawar News : आमदार राम शिंदेंच्या आवाहनानंतर रोहित पवार 'चौंडी'ला जाणार का?

दरम्यान, फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भेटीबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, "अराजकीय गप्पा मारण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो. बऱ्याच दिवसांपासून ठरले होते की एक दिवस गप्पा मारायला बसू. त्यासाठी मुहूर्त काल लागला. आम्ही गप्पा मारल्या मात्र, या भेटीत अराजकीय गप्पा झाल्या. असे ठरले होते की, राजकीय सोडून गप्पा करायच्या. गप्पा या अराजकीय असतात."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com