Devendra Fadnavis : ठाकरे सरकारच्या काळात गेलेले प्रकल्प आमच्या नावाने दाखवणे बंद करा!

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीच्या सरकारवर याचे खापर फोडले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारवर उद्योगांच्या स्थलांतराच्या मु्द्द्यावरून विरोधकांनी बरसून टीका होत असताना, आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची चर्चा होत आहे. केंद्र सरकारकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्राप्त करण्याच्या स्पर्धामध्येही महाराष्ट्र मागे पडला आहे. ऊर्जा निर्माण झोन मिळवण्यात मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाने महाराष्ट्रावर मात केली आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा टीकेची राळ उडवलेली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस, मेडीकल बल्क या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टिका होत आहे. आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच (एमआयडीसी) प्रयत्न करत होती. यात मध्य प्रदेशाने महाराष्ट्रावर मात केली आहे. आता यावर आपली बाजू मांडतान यासाठीही शिंदे-फडणवीस सरकारने यासाठी मागील सरकार म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारवर याचे खापर फोडले.

Devendra Fadnavis
Gujarat Election : प्रचारासाठी कोटींची उड्डाणे, विमाने,हेलिकॉप्टरच्या बुंकिगसाठी भाजप, काँग्रेस, आपची धावाधाव

मोठे उद्योजक उद्योग निर्मितीसाठी अर्ज करताना प्रोत्साहीत होतात. जर एखादा आपल्याकडे आला नाही, तर महाराष्ट्रातून पळवला, असा आरोप केला जाईल, अशी धास्ती त्यांना वाटू लागली आहे. मागील सरकारच्या काळातच राज्यातून गेलेले प्रकल्पांचे पाप आमच्या नावावर खपवू नये, असे फडणवीस पुन्हा म्हणाले.

Devendra Fadnavis
Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो' यात्रेत कोल्हापुरकरांचा 'नाद' खुळा!

दरम्यान, फेब्रुवारी २०२२ च्या केंद्रिय अर्थसंकल्पात २०२२-२३ साठी या औद्योगिक झोनची घोषणा झाली होती. पुढील पंचवार्षिकसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी या झोनसाठी वितरीत होणार होते. यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून २०२२ ही होती. मात्र याच काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यांनी याबाबात उदासीनता दाखवली, असं शिंदे-फडणवीस सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com