मनसे-भाजप युती होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!

Devendra Fadnavis | MNS | Raj Thackeray : मनसे-भाजप युतीसाठी संघाचाही ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा
मनसे-भाजप युती होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!
Raj Thackeray News| Devendra fadanvis News | MNS-BJP alliance news | MNS News UpdatesSarkarnama

पुणे : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्मााण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादची (Aurangabad) नियोजीत सभा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राज ठाकरे यांची यापूर्वीची गुडीपाडव्याची सभा, त्यानंतरची ठाण्यातील उत्तरसभा आणि आता औरंगाबाद येथे होणारी सभा, या सर्व सभांमध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदूत्वाच्या भूमिकेमुळे राज्यभरात वेगळेच वातावरण तयार झाले आहे. तर दूसरीकडे राज ठाकरे यांची हिंदूत्त्वाची भूमिका आणि त्याला भाजपचा मिळणारा पाठिंबा यामुळे राज्यात आता मनसे-भाजप युतीच्या चर्चांही जोर धरु लागल्या आहेत. (MNS-BJP alliance news)

मात्र या चर्चांमध्ये कोणतेही तत्थ नसल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. युतीच्या या बातम्या काही लोकांनी मुद्दाम सोडल्या आहेत. आमची औपचारिक बैठक देखील झालेली नाही, तसेच अशा बैठकीचाही कोणता प्रस्ताव नाही. अलीकडील काही काळात राज ठाकरे यांनी ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्या आम्ही देखील अनेक दिवसांपासून मांडत आहोत. मात्र, आमची अजून कोणतीही चर्चा झालेली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Raj Thackeray News| Devendra fadanvis News | MNS-BJP alliance news | MNS News Updates
ठाकरे सरकार बरखास्तीसाठीच राणा दांपत्याने 'मातोश्री'ची निवड केली होती!

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांबद्दलचीही भूमिका काहीशी मृदू झाली आहे. ते ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. अलिकडेच राज ठाकरे यांनी भोंग्यावरील निर्णयामुळे योगी आदित्यनाथ यांचे कौतूक केले होते. या सर्वांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही मनसे सोबत युती करण्यासाठी भाजपला ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचे सांगण्यात आले होते.

Raj Thackeray News| Devendra fadanvis News | MNS-BJP alliance news | MNS News Updates
‘ठाकरेंवर टीका करा अन वाय सुरक्षा मिळवा; मोदी सरकारची नवी योजना’

राज ठाकरे यांंनी मनसेची स्थापना झाल्यापासून उत्तर भारतीयांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही तोपर्यंत भाजप मनसेसोबतच युतीचा कोणताही विचार करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. पण अलीकडे उत्तर भारतीयांप्रती राज ठाकरे यांची भूमिका नरमल्याने मनसे-भाजपा युती होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्काम करणार असून यावेळी ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पुण्यातूनच ते १ मे रोजी औरंगाबाद येथील सभेसाठी रवाना होतील. या सभेच्या परवानगी पासून अनेक मुद्द्यांवर वाद निर्माण झाला होता. अनेक संघटनांनी या सभेला विरोध केला मात्र, औरंगाबाद पोलिसांनी अखेरच्या क्षणी अटी-शर्तींसह या सभेला परवानगी दिली. आता या सभेकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.