कोल्हापुरातील काँग्रेसच्या विजयाचे फडणवीसांनी सांगितले गुपित

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांचा विजय झाला आहे.
कोल्हापुरातील काँग्रेसच्या विजयाचे फडणवीसांनी सांगितले गुपित
Devendra Fadnavis Sarkarnama

मुंबई : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांचा विजय झाला आहे. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, काँग्रेसचा हा विजय केवळ सहानुभूतीमुळे मिळाला आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत ही जागा भाजपच (BJP) जिंकणार असा, विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. नेशन टू सेव्ह या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी फडणवीस उपस्थित राहिले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, भाजप हा पहिल्या दिवसांपासून आपला बेस वाढवत आहे. भाजप-शिवसेना (shivsena) एकत्र असताना जेवढी मते मिळत होती त्यापेक्षा जास्त मते भाजपला मिळाली आहेत. तीन पक्ष एकत्रित असतानाही भाजपला फायदा झाला आहे. काँग्रेसचा विजय हा सहानुभूतीमुळे झाला आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार जिंकणार, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
मी राष्ट्रवादीत जाणार नाही; भाजपमध्येच समाधानी!

हनुमान चाळीसा आम्ही शतकानुशतके म्हणत आलो आहे. ज्यांना दुःख होत आहे त्यांचे कारण काही तरी वेगळ आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावाला. त्याच बरोबर ते म्हणाले, "जेव्हा कोरोना महामारी आली तेव्हा पंतप्रधानांनी आधीच सांगितले होते की यामध्ये राजकारण करु नये. राज्यात आणि मुंबईत सर्वात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण होते. मात्र, यावेळी महाराष्ट्रात राजकारण झाले याचे दुःख आहे.

Devendra Fadnavis
'कोल्हापुरात शिवसेनेची मते भाजपला मिळाली!'

केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली. सर्व पैसे राज्य सरकार घेत होते. मात्र, केंद्राने मदत केली नाही अशी टीका करत होते. सर्वात जास्त पीपीई किट, ऑक्सिजन राज्याला केंद्राने दिले. केंद्राने राज्याला 1 हजार 200 कोटी रुपये दिले. मात्र, त्यातले 600 कोटी राज्याने खर्च केले. यातही राजकारण करण्यात आले असा फडणवीस यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.