पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या वक्तव्यावर, फडणवीसांनी दाखवले हायकमांडकडे बोट

मुंबई : भाजप (BJP) नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मी विधान परिषदेवर जावे ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे, असे म्हटले होते.
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या वक्तव्यावर, फडणवीसांनी दाखवले हायकमांडकडे बोट
Pankaja Munde, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मी विधान परिषदेवर जावे ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे, असे म्हटले होते. पंकजा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुचक वक्तव्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या नावाला आमचा पाठिंबा आहे. त्या आणि हायकमांड निर्णय घेतील. पंकजा मुंडे सर्व पदांसाठी एलिजिबल आहेत, असे त्यांनी सांगितले. हायकमांडने परवानगी दिली तर आम्ही राज्यसभेची सहावी जागा लढवणार, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde, Devendra Fadnavis
मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा : पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या कोट्यात आहे. हे माहीत असताना देखील शरद पवार (Sharad Pawar) यांनी संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहिर केली होती. शरद पवार यांनी अशा प्रकारे भूमिका जाहिर करुन संभाजीराजेंची कोंडी केली, असा आरोपही फडणवीस यांनी केला. आधी तुम्हाला मते देऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते, असा दावा फडणवीस यांनी केला. नंतर शिवसेना (Shivsena) मते देईल, मात्र नंतर त्यांनी फोनही उचलला नाही, माझा पण फोन उचलला नव्हता, दरवेळी असे घडते असेही फडणवीस म्हणाले.

लोकांमध्ये श्रद्धा वाढायला हवी अंधश्रद्धा नको. त्यामुळे शरद पवार साहेब जर दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो, श्रद्धा वाढतेय हे चांगले आहे. नेत्यांची शद्धा वाढली की लोकांची श्रध्दा वाढते. ही चांगली सुरूवात आहे, फडणवीस म्हणाले.

Pankaja Munde, Devendra Fadnavis
मी नॉनव्हेज खाल्ले आहे..! पवारांनी बाहेरूनच घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

ईडी आणि सीबीआय ह्या केंद्राच्या अत्यंत प्रोफेशनल एजन्सी आहेत. त्यांच्याकडे एखाद्या आरोपी विरोधात पुरावे असतील. त्यामुळे त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले वर कारवाई केली असले. जर एखादा आरोपी विरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध झाले नसतील तर ते त्या आरोपीचे नाव चार्जशीट मधून एजेंशी वगळतात. त्यामुळे त्यांनी आर्यन खानला एनसीबीने क्लीन चीट दिली, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे काय म्हणाल्या, मी जनतेच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्ष लढत आहे. आता राज्यात विधान परिषदेच्या १० जागांवर निवडणूक पार पडत आहे. अशावेळी मला विधान परिषदेवर पाठवावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in