'आमच्यात दुरावा, कुरघोडीच राजकारण दिसणार नाही'

assembly floor test| बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ८० च्या दशकात शिंदेनी शिवसेनेत काम सुरु केलं.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्यात कधीही दुरावा दिसणार नाही, कुरघोडीचं राजकारण दिसणार नाही, मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा असेल, या सरकारमध्ये सत्तेसाठी कधीही भांडण होणार नाही, आम्ही सहकार्य करत राहू. एकनाथ शिंदे नक्कीच यशस्वी मुख्यमंत्री होतील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.

विधानसभेत बहुमताचा प्रस्ताव जिंकल्यानंतर फडणवीस बोलत होते. महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हाच मी सांगत होतो, हे सरकार अनैसर्गिक आहे, टिकणार नाही. काही लोक मतदान करताना इडी म्हणून ओरडत होते. हो ही मंडळी इडी मुळे आली आणि ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र हे आहेत. असंही फडणवीसांनी सांगितंल.

Devendra Fadanvis
Floor Test LIVE : ज्यांनी टिंगल केली, त्यांचा मी बदला घेणार : फडणवीसांचा इशारा

मी एक कविता म्हणालो होतो, मी पुन्हा येईन. त्यावर अनेकांनी माझी खुप टिंगलटवाळी केली. पण मी आलो, पण एकटा नाही आलो, यांनाही सोबत घेऊन आलो. ज्यांनी टिंगलटवाळी केली, अपमान केला त्यांचा मी बदला घेणार. माझा बदला एवढाच असेल की, मी त्यांना माफ केलं. राजकारणात अशा गोष्टी मनावर घेऊ नयेत. दुनिया के सारे शौक पाले नही जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नही जाते. कोशिशे करने से हर काम होते है आसान, तकदीर के भरोसे टाले नही जाते, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षांना लगावला.

एकनाथ शिंदे कधीकधी शांत बसलेले दिसतात, कमी बोलायचं आणि काम जास्त करायचं. त्यांच्यातील प्रचंड पेशन्स आहेत. त्यांची ही जडणघडण त्यातूनच झाली आहे. लहानपणी गरिबीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यामुळे त्यावेळी ते दहावीपर्यंतच शिकले. पण वयाच्या 56 व्या वर्षी डिग्री मिळवली आणि 77 टक्के गुण घेत त्यांनी बीएची पदवी मिळवली.

Devendra Fadanvis
assembly floor test : भाजपचा जल्लोष : शिंदे सरकारकडून बहुमताचा आकडा पार

एकनाथ शिंदे दिवंगत बाळासाहेबांचे पाईक आणि कर्मावर विश्वास असलेले कट्टर शिवसैनिक आहेत. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ८० च्या दशकात शिंदेनी शिवसेनेत काम सुरु केलं. कार्यकर्ता, शाखाप्रमुख पदापासून ते आज मुख्यमंत्री पदापयर्यंत पोहचले, अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. सामान्यांच्या न्यायासाठी केसेस अंगावर घेतल्या. अनेकदा जेल झाली, पण स्व:तची पर्वा न करता त्यांनी सर्वसामान्यांची सेवा केली. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आंदोलन केलं आणि लोकांना न्याय मिळावून दिला.

२००४ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडूण आले. त्यानंतर ते आतापर्यंत ४ वेळा निवडूण आले. शिवसेना भाजप युतीच्या काळात माज्यासोबत मंत्री म्हणून काम केलं. एमएसआरडीसी खात्यात चमक दाखवली, समरुद्धी महामार्गात मोठी भूमिका घेतली. सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. ४० दिवस बेल्लारीच्या जेल मध्ये होते. १९९७ मध्ये ठाणे महापालिकेत नगरसेवक झाले, ठाण्याचे जिल्हाप्रमुख झाले, नगरसेवक पदापासून त्यांनी कारकिर्द सुरु केली. ज्या व्यक्तीत कर्तृत्व असते तो काहीही करु शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com