पंकजा मुंडे नाराज आहेत का? : फडणवीस म्हणाले आम्ही संपर्कात आहोत...

भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने समर्थक संतप्त
पंकजा मुंडे नाराज आहेत का? : फडणवीस म्हणाले आम्ही संपर्कात आहोत...
Pankaja Munde, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीमध्ये (Legislative Council Election) भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे पंकजा समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. राज्यात विविध भागात पंकजा समर्थक रस्त्यावर उतरलेले पाह्यला मिळाले. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पंकजा मुंडे नाराज आहेत का? असा सवाल केला. त्यावर फडणवीस यांनी भाजप (BJP) एक परिवार आहे, असे उत्तर दिले. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पंकजाताई भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात. तिथे आता निवडणुकाही आहेत. तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो. तुम्ही काळजी करुन नका. भाजप एक परिवार आहे, आम्ही सगळे या परिवाचे घटक आहेत, असे फडणवीस म्हणाले.

Pankaja Munde, Devendra Fadnavis
ओबीसींचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने; आरक्षणाला फटका बसणार!

दरम्यान, पंकजा मुंडे समर्थकांनी रविवारी बीडमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दरेकर आणि फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोरही मोठा राडा पाह्यला मिळाला. या संपूर्ण प्रकरणावर पंकजा मुंडे यांचे मैन आहे.

Pankaja Munde, Devendra Fadnavis
मी जास्त बोलत नाही पण पाचवी जागा आम्ही निश्चित जिंकू!

त्याच बरोबर यावेळी फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकी वरही भाष्य केले. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षाने माझ्याशी चर्चा केली होती. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. आता पाचवी जागा आम्ही निश्चित जिंकू, असा दावा फडणवीस यांनी केला. मी फार जास्त बोलत नसतो. मला विश्वास आहे, आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल. आम्ही पक्षीय पातळीवर चर्चा केली, त्यामुळे आम्ही सहावी जागा न लढवण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in