देवेंद्र फडणवीस पोहचले राज ठाकरेंच्या निवास्थानी, युतीच्या चर्चांना उधाण

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राज ठाकरे भेटींमुळे चर्चेला उधाण
देवेंद्र फडणवीस पोहचले राज ठाकरेंच्या निवास्थानी, युतीच्या चर्चांना उधाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप- मनसे युतीच्या (BJP- MNS) बातम्या पसरल्या होत्या. भाजप नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात भाजप- मनसेची युती होणार का, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली.

त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहचले आहेत. अमृता फडणवीस या देखील त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या भेटीचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. वरवर ही कौटुंबिक भेट असल्याचे म्हटले जात असले तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राज ठाकरे भेट महत्वाची मानली जात आहे.

देवेंद्र फडणवीस पोहचले राज ठाकरेंच्या निवास्थानी, युतीच्या चर्चांना उधाण
नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेना आमदाराचा आरोप

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरल्यानंतर भाजप नेत्यांच्या आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी अलीकडे वाढल्या आहेत. याशिवाय आगामी मुंबई महापालिका निवडणूका पाहता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे त्यांच्या नव्या शिवतीर्थ या निवासस्थानी राहायला आल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच त्यांच्या निवासस्थानी आले आहेत.

दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही राज यांच्या घरी त्यांची त्यांची भेट घेतली होती. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील सपत्नीक त्यांच्या घरी गेले होते. राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाचं निमंत्रण दिलं. त्यानंतर आज फडणवीसांनी राज यांच्या घरी पोहचल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in