Mahavitaran Strike : महावितरणच्या संपात 'आप' ची उडी ; फडणवीस काय तोडगा काढणार ?

Mahavitaran Strike News : वीज नसल्यामुळे अनेक नागरिकांचे हाल होत आहेत.
mahavitaran
mahavitaransarkarnama

Maharashtra Power Cut : अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा राज्य सरकारवर आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी आजपासून (बुधवार) संप पुकारला आहे. महावितरणाच्या खासगीकरणास महावितरण कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. (Mahavitaran Strike latest News)

आजपासून ३ दिवस म्हणजे ४ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान संप असणार आहे. कर्मचारी कामावर नसल्याने राज्यातील विविध भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज नसल्यामुळे अनेक नागरिकांचे हाल होत आहेत.

mahavitaran
Maratha Kranti Morcha : 'मविआ' नंतर आता शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

महावितरण वीज कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई उपनगरात अदानी या खासगी कंपनीला वीजपुरवठ्यासाठी परवाना देऊ नये, या मागणीसाठी महावितरणचे कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर गेले आहेत. या संपात आत आम आदमी पक्षाने उडी घेतली आहे. या आंदोलनाला आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला आहे. याबाबतचे पत्र आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे .

mahavitaran
Nitesh Rane : राजकारण पेटलं : राणेंनी आव्हाडांना दिली हिंदू मंदीरांची यादी..

महावितरणच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे ठिकठिकाणी फटका बसत आहे. सध्या कोयना धरण क्षेत्रातली वीज निर्मिती बंद झाली आहे. महावितरण, महाजनको आणि महापारेषषणमधील खासगीकरणाला विरोध म्हणत कर्मचाऱ्यांनी गुरुवार मध्यरात्रीपासून तीन दिवस संप पुकारला आहे.

वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात 31 संघटनांचे दीड लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत (मेस्मा) कारवाईचा इशारा दिला आहे.

तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com