देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरु...

Devendra Fadnavis | BJP | Uddhav Thackeray | भाजप नेत्यांनी फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छाही दिल्या...
Devendra Fadnavis | BJP
Devendra Fadnavis | BJPSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला ४८ तास झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या ३४ आमदारांसह आधी सुरत आणि त्यानंतर आसामध्ये गुवाहटी गाठले आहे. त्यांच्या बंडामागे भाजपची (BJP) आणि त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची फूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तरीही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप काय आणि कशी भूमिका घेणार, याविषयी फडणवीस यांनी भाष्य केलेले नाही. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

अशातच भाजपचे नेत्यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठीची तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळाले आहे. कधीकाळी शिवसेनेत असलेले आणि सध्याचे भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना हाजी अली दर्गा येथे केली. त्यानंतर शेख यांनी तिथून आणलेली चादर फडणवीस यांनीही माथ्याला लावली. "एकनाथ शिंदेंचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र मी जे भोगले ते त्यांनीही भोगले असावे. म्हणूनच हा उद्रेक झाला आहे. किमान या उद्रेकानंतर तरी राज्याच्या विकासाची खोळंबली कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे", असे म्हणतं त्यांनी फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी प्रार्थना केली.

एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुजरातला गेले तेव्हा फडणवीस दिल्लीमध्ये होते. तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते मंगळवारी मुंबईत दाखल झाले. फडणवीस मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार फडणवीस यांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देत आहेत. (Devendra Fadnavis Latest News)

आज दिवसभरामध्ये केंद्रीय मंत्री राबसाहेब दानवे, आमदार गिरीष महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते भेटून गेले आहेत. यानंतर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, ''शिंदेंचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. त्याचबरोबर सरकार स्थापनेसंदर्भात जर शिंदे यांनी प्रस्थाव दिला तर आम्ही विचार करु, असेही पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com