ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोवर भाजपचा संघर्ष थांबणार नाही; फडणवीस आक्रमक

भाजप (BJP) नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला इशारा दिला.
BJP Leader Devendra Fadnavis
BJP Leader Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : ओबीसींच्या (OBC Reservation) राजकीय आरक्षणावरुन सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण तापले आहे. भाजपने (BJP) आज आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा काढला. मात्र, मोर्चा मंत्रालयापर्यंत पोहचण्याआधीच पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेतले होते. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केली.

या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये फडणवीस म्हणाले, आंदोलनादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आणि इतर अनेक नेते, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. दडपशाही करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार! असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

BJP Leader Devendra Fadnavis
... मग मध्यप्रदेश काय पाकिस्तानमध्ये आहे काय? : आशिष शेलारांचा शरद पवारांना सवाल

ओबीसी आरक्षणाची हत्या महाविकास आघाडी सरकारने केली आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्रावर खापर फोडायचे, यापलिकडे गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने काहीही केले नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. एम्पिरिकल डाटा हवा असताना आणि ते काम राज्य सरकारचेच असताना आधी केंद्रावर दोषारोप, नंतर न्यायालयात वेळकाढूपणा, मागासवर्ग आयोग नेमला तर त्याला सुविधा आणि निधी न देणे यामुळे ओबीसी समाजावर मोठाच अन्याय महाविकास आघाडी सरकारने केला.

BJP Leader Devendra Fadnavis
'इम्पिरिकल डाटा, ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, हे उद्धव ठाकरे सांगतील का?'

मध्यप्रदेशने मागासवर्ग आयोग गठीत केला. ट्रिपल टेस्टप्रमाणे कार्यवाही केली. न्यायालयाने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय सुधारित अहवाल मागितला, तर त्यांनी तेही काम केले. मग तेच काम महाविकास आघाडीला का जमले नाही? जोवर ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोवर भाजपचा संघर्ष थांबणार नाही! असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in