ओबीसींचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने; आरक्षणाला फटका बसणार!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
Devendra Fadnavis Latest Marathi News
Devendra Fadnavis Latest Marathi Newssarkarnama

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन (OBC Reservation) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केली. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत इम्पेरिकल डाटा बनवण्याचे काम सुरू आहे. डाटा गोळा करण्याची पद्धत सदोष आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

फडणवीस मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अनेक वेळा आडनावे वेगवेगळी असतात. आता जो सर्व्हे केला जात आहे त्यात ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात घटेल असे दिसत आहे. मी आज आकडेवारी सांगत नाही. पण लवकरच सांगणार आहे. सरकारला आजच सांगतो तुमचे आकडे आणि सर्व्हे चुकत आहेत.

Devendra Fadnavis Latest Marathi News
देशमुख-मलिक यांना विधानपरिषद निवडणूकीत मतदानाची परवानगी मिळणार का?

मध्यप्रदेश सरकारने एका एका जिल्ह्याचा सर्व्हे केला होता. मात्र, इथे कुणी लक्ष देत नाही. सरकारने तात्काळ चौकशी करावी, अन्यथा मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. छगन भुजबळ हे प्रयत्न करत आहेत यात शंका नाही, पण सरकारमध्ये मंत्र्यांची क्षमता त्या पलीकडे ते काही करू शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यामध्ये लक्ष घातले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. एकदा हे सर्वेक्षण पूर्ण होऊन, न्यायालयात सादर झाले की मग त्यातून माघार घेता येणार नाही. ओबीसींचे कायमस्वरूपी आणि मोठे नुकसान झालेले असेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Devendra Fadnavis Latest Marathi News
खोत, गर्जेच्या माघारीनंतरही काँग्रेस लढण्यावर ठाम; विधान परिषदेचा आखाडाही रंगणार!

त्याच बरोबर यावेळी फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकी वरही भाष्य केले. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षाने माझ्याशी चर्चा केली होती. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. आता पाचवी जागा आम्ही निश्चित जिंकू, असा दावा फडणवीस यांनी केला. मी फार जास्त बोलत नसतो. मला विश्वास आहे, आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल. आम्ही पक्षीय पातळीवर चर्चा केली, त्यामुळे आम्ही सहावी जागा न लढवण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com