मालेगाव अन् अमरावतीची घटना हा प्रयोग, देशात अराजक माजवण्याचा डाव!

प्रत्येक विभागात एक वाझे आहे.
 Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणिही मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वताःला मुख्यमंत्री समजत आहे. आज राज्यात मोठ्या प्रमाणात अराजक निर्माण झाले आहे. कोणीही राज्य म्हणून चर्चा करायला तयार नाही. आमच्या सरकारच्या काळात विकासावर चर्चा होत होती. मात्र, या सरकारच्या काळात गांज्या, वसूली, स्थगिती, दंगली, खंडणी, अनाचार, दुराचार पाह्याला मिळतो, महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

मुंबईमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीनीची बैठक झाली. त्यामध्ये फडणवीस बोलत बोते. या वेळी फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशा शुभेच्छा. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. प्रत्येक विभागात एक वाझे आहे. सरकार सामान्यांकरता नाही. कायद्याचे राज्य नाही. नुकत्याच काही ठिकाणी आयटीच्या धाडी राज्यात पडल्या होत्या. आयटीच्या धाडीमध्ये हजारो कोटी रुपयाची लूट चालली असल्याचे समोर आले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

 Devendra Fadnavis
राज्यातील 9 मंत्र्यांचे मी उदाहरण देतो, तुम्ही कारवाई करा! आशिष शेलारांचे आव्हान

सामान्य शेतकऱ्यांकडे कोणीच पाह्यला तयार नाही. सुधीन मुनगंटीवार यांनी चांगला प्रस्थाव मांडला. मात्र, यांचे किती कपडे काढले तरी निरलज्जांना काही फरक पडत नाही. आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. तुम्ही आम्हाला थांबवू शकणार नाही. कोरोना काळामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले. राजकारणाच्या गुन्हेगारी करणाचा प्रस्थाव मांडला. देश द्रोही लोकांसोबत हे सरकार काम करत आहे. जिल्ह्यामध्ये एक नेक्सस सुरु झाला आहे. एकमेव काम चालू आहे, अवैध रेती, अवैध दारू. कोणतेही सरकार सत्तेवर आले तर महाराष्ट्राला पूर्व पदावर आण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. पोलिस विभागाची अवस्था काय झाली, कुठल्या तोंडाने आमचे नेते पोलिसांना सांगणार आहेत की भ्रष्टाचार करु नका, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

 Devendra Fadnavis
बावनकुळे म्हणाले, पावणेतीन लाख गरीबांचे धान्य मंत्र्यांनी खाल्ले...

सरकारने बाजार मांडला आहे, असे अनेक अधिकारी मला सांगत आहेत. लढाई ही समोरुन लढाई लागते, ती बोटचेप्या धोरणाने लढता येत नाही. आम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आमच्याजवळ ईनामी नाही आणि बेनामी नाही. ५ वर्ष मुख्यमंत्री होतो तरी मुंबईत घर नव्हेत. वर्षा बंगला सोडल्यानंतर चार महिने भाड्याच्या घरात राहिलो. नांदेड, अमरावतीमध्ये घडलेली घटणा हा एक प्रयोग आहे. देशात आराजक माजवण्याच प्रयत्न आहे. बंगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले, त्याच्या विरोधात त्रिपूरामध्ये मोर्चा निघाला होता. मात्र, सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली गेली. पाकिस्तामधली फोटो त्रिपूरामधील घटनेचे फोटो आहेत असे सांगितले गेले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले त्रिपूरामध्ये मुसलीमांवर अत्याचार होत आहेत. त्यांतर महाराष्ट्रातील सगळ्या शहरांमध्ये मोर्चे निघाले. कोणाच्याही लक्षात नसताना एकाच वेळी वेगवेगळ्या शहरात कसे मोर्चे निधू शकतात, असा सवाल फडणवीस यांनी केला. या सगळ्या मोर्चांना सरकारचे समर्थन होते, असा आरोपही फडणवीस यांनी केला. हिंदूची दुकाने जाळली गेली त्या विरोधात कोणिच काही बोलले नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com