बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, मी उपस्थित होतो: फडणवीस

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, मी उपस्थित होतो: फडणवीस
Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : महाराष्ट्र दिन फक्त साजरा करण्याचा दिवस नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा दिवस आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर भाजपच्या (Bjp) बुस्टर डोस सभेत फडणवीस बोलत होते. काही लोकांना असे वाटत ते की ते म्हणजेच महाराष्ट्र आहे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला.

फडणवीस यावेळी म्हणाले, काही लोकांचा गैर समज आहे की, ते म्हणजेच महाराष्ट्र आणि मराठी आहे. त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान, असे त्यांना वाटते. मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो, लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जातीच्या 12 कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आहे. त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान. तुम्ही म्हणजे, हिंदू नाही.. मात्र, मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
बाळासाहेब थोरात म्हणाले, राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीचे मतांत परिवर्तन होणार नाही...

महाराष्ट्राच्या नावाला बंटा लावण्याचे काम तुमच्या सरकारमध्ये होत आहे, असा हल्लाबोल केला. मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर तुमची हातभर फाटली, आणि सांगता मशिद पाडली. मी तो ढाच्या पाडण्यासाठी होतो. तुम्ही कुठे होतात. १८ दिवस मी जेलमध्ये होतो. बाबरी पाडली त्यावेळी महाराष्ट्रातील एकही शिवसेनेचा (Shivsena) नेता नव्हता, असेही फडणवीस म्हणाले. बाबरी पाडली त्यामध्ये ३२ आरोपी होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणताच शिवसेनेचा नेता नव्हता. आमचा दोष काय आहे तर आम्हला प्रसिद्ध करता येत नाही. ज्या वेळी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तो कारसेवकांनी आणि राम भक्तांनी पाडला, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
निकालाला पंधरा दिवस उलटूनही शपथ नाही! राज्यपाल अन् आमदारामध्ये जुंपली

ज्यांनी रामाला विरोध केला, त्यांच्या मांडिला मांडी लावून तुम्ही बसले आहात, असा आरोप फडणवीस यांनी केला. आता महाराष्ट्रामध्ये हनुमान चालिसा म्हटली तर राज द्रोहाचा गुन्हा दाखल होतो. राणा दांपत्यांनी मला सांगितले असते तर मी म्हटले असते की मी माजी मुख्यमंत्री आहे. माझ्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणा. हनुमान चालिसा म्हटली तर रामाचे राज्य जाईल का रावणाचे राज्य जाईल, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.