भाजपच्या हालचालींना वेग, फडणवीस पुन्हा दिल्लीत; नड्डा-शहांबरोबर केली चर्चा

Devendra Fadnavis : बंडखोर आमदारांना मुंबईत परत आणण्याची रूपरेषा फडणवीस प्रत्यक्षात आणतील, असे बोलले जात आहे.
Amit Shah, Devendra Fadnavis Latest News
Amit Shah, Devendra Fadnavis Latest News sarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तारूढ शिवसेनतील (Shivsena) बंडखोरीनंतरच्या तप्त राजकीय वातावरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (ता. 28 जून) पुन्हा दिल्ली गाठली व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, (Amit Shah) भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Ndda) यांच्यासह ज्येष्ठ कायदेत तज्ज्ञांबरोबर राज्यतील परिस्थितीबाबत चर्चा केली.

२१ तारखेच्या मध्यरात्रीच्या बंडखोरींनंतर किमान चार वेळा कधी रात्री तर कधी पहाटे दिल्लीत येऊन गेलेले फडणवीस यांची आजची दिल्ली वारी `माध्यमांना` व्यवस्थितपणे कळावी, अशा रितीने आयोजित केली गेली. यामुळे राज्यात सत्ता स्थापनेबाबतच्या ठोस हालचालींना भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने आता अंतिम नियोजनास सुरवात केल्याच स्पष्ट आहे.

Amit Shah, Devendra Fadnavis Latest News
नाती आणि सरकारं टिव्हीपेक्षा सोबत चर्चा करुन टिकतात : सुप्रिया सुळेंचा बंडखोरांना टोला

सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोरीनंतर भाजप सत्तास्थापनेसाठी पुढील पर्यायांवर ठळकपणे विचार करत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर 'अविश्वास प्रस्ताव' आणणे, विधानसभेचे अधिवेशन बोलावून सरकारचे अल्पमत सिध्द करण्याची व्यवस्था करणे व दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत बंडखोर आमदारांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचे सिध्द करणे. याच दरम्यान बंडखोर आमदारांनाही मुंबईत परत आणण्याची रूपरेषा भाजप नेतृत्वाच्या सल्ल्याने फडणवीस प्रत्यक्षात आणतील, असे समजते.

फडणवीस आज दुपारी इंदिरा गांधी विमानतळावर उतरले. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी हे देखील होते. फडणवीस थेट शहांकडे जाणार असे कानोकानी सांगण्यात आल्याने माध्यम प्रतीनिधी शहांच्या निवासस्थानाजवळ धावले. प्रत्यक्षात फडणवीस तिकडे न जाता थेट मोतीलाल नेहरू मार्गावर नड्डांच्या निवासस्थानी गेले. तेथे उभयतांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. भाजपमधील संघप्रतीनिधीही यावेळी उपस्थित असल्याचे समजते.

Amit Shah, Devendra Fadnavis Latest News
'आमचा मुख्यमंत्री असूनही औरंगाबादचे नामांतर राष्ट्रवादी आणि कॅाग्रेसने करू दिले नाही'

फडणवीस यांनी भाजप महासचिव अरूण सिह यांचीही भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास फडणवीस `पुढील सूचना` घेण्यासाठी अमित शहांच्या दरबारात पोहोचले. शहा यांच्या निवासस्थानातील कार्यालयात या संपूर्ण बंडखोरी नाट्यात बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे, फडणवीस, गुजरात व आसाम सरकारे आणि दिल्लीत स्वतः शहा यांच्यात समन्वयाची सूत्रे सांभाळणाऱ्या एका अधिकाऱ्याशी त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी शहांबरोबर सुमारे ४० मिनीटे चर्चा केली.

याच दरम्यान फडणवीस यांनी माजी सॅालिसीटर जनरल मुकूल रोहतगी व काही वरिष्ठ कायदेतज्ज्ञांबरोबर देखील चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईत परतले. एकनाथ शिंदे हेही आज रात्री मुंबईत येूवून फडणवीस यांच्याशी चर्चा करून बंडखोर आमदारांच्या घरवापसीची रूपरेषा तयार करतील असे सांगितले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com