Maharashtra Assembly session : देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केलं... हे सरकार `ईडी`मुळे आले..

Maharashtra Political Crisis News Today : एकनाथ शिंदे सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर
Devendra Fadnavis Latest Marathi News, Floor Test News, Maharashtra Session news
Devendra Fadnavis Latest Marathi News, Floor Test News, Maharashtra Session newsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकावरील विश्वासदर्शक ठराव आज मंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी जोरदार भाषण केले. शिंदे यांचे वारेमाप कौतुक त्यांनी केले. तसेच हे सरकार ईडीमुळे आल्याचा विरोधकांचा आरोप खरा असल्याचे सांगत पण हे ईडी म्हणजे एकनाथ-फडणवीस असे आहे, असा दावा त्यांनी केला. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत पुढीलप्रमाणे

Devendra Fadnavis Latest Marathi News, Floor Test News, Maharashtra Session news
Maharashtra Politics Live : भाजपनं शिंदेंना पाठिंबा देण्यात काहीतरी काळंबेरं!

आमच्या काळात सुरू झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पात एकनाथराव शिंदे यांनी अतिशय मोठे योगदान दिले. आरोग्य खात्यात सुद्धा त्यांनी अतिशय चांगले काम केले. शिंदे हे एक वेगळे रसायन आहे. 24*7 काम करणारा हा नेता आहे. माणुसकी असलेला हा नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही आनंद दिघे साहेब यांची शिकवण, तोच कित्ता एकनाथराव शिंदे हे आज पुढे नेत आहेत.(Maharashtra Assembly session)

नंदुरबारहून आदिवासींचा मोर्चा निघाला तर त्यावेळी आमच्या इतर नेत्यांसोबत एकनाथराव शिंदे मोर्चेकऱ्यांच्या व्यवस्थेत धावले. मोर्चा विरोधात असला तरी त्यांची काळजी घेतली पाहिजे, हेच आमचे धोरण होते. कुणी विरोधात आहे, म्हणून छळ करायचा हे आमचे धोरण कधीच नव्हते.

अतिशय कष्टाने एकनाथराव शिंदे यांनी आपले आयुष्य उभे केले. स्वतच्या जीवनात अनेक कटू प्रसंग आले, पण न थकता त्यांनी आयुष्य उभे केले. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हा निर्धार मोलाचा आहे.

ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली, त्यांना मी माफ केले आहे. त्यांना माफ करणे हाच त्यांचा बदला आहे.

Devendra Fadnavis Latest Marathi News, Floor Test News, Maharashtra Session news
फडणवीस यांचा नेहमीचा जोश त्यांच्या भाषणात नव्हता : अजित पवारांची टोलेबाजी

सत्ता हे आमच्यासाठी केवळ साधन आहे. आमची खंत एकच होती, की जनतेने जनादेश देऊन सुद्धा एक विचित्र आघाडी जन्माला घातली गेली. त्यांचा अपमान केला गेला.

मी कुणाला उपमा देत नाही, पण जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा कोणाला तरी चाणक्य बनून चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ती व्यवस्था ध्वस्त करावी लागते.

मी नशीबवान आहे की माझे मुंबईत घर नाही. त्यामुळे माझे घर तुटले नाही आणि सरकारविरुद्ध आवाज उठवू शकलो.

महाराष्ट्राचे राजकारण वेगळे आहे. कुणी किती मोठे विरोधक असले तरी आपण एकमेकांकडे जातो. हे राजकारण असेच असले पाहिजे. सत्तेचा अहंकार डोक्यात जाऊन उपयोग नसतो. मध्यंतरीच्या काळात अनेक दुर्दैवी घटना महाराष्ट्राने अनुभवल्या.

नेत्यांच्या उपलब्धतेचा अनुशेष महाराष्ट्रात निर्माण झाला होता, ती कसर आता भरून निघेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com