NCP नेत्याच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीलाही NCB ने सोडलंय : फडणविसांचा पलटवार

राष्ट्रवादीचे मंत्री मलिक (Nawab Malik) यांनी केलेले आरोप फडणवीस यांनी फेटाळले..
NCP नेत्याच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीलाही NCB ने सोडलंय : फडणविसांचा पलटवार
Devendra Fadnavis sarkarnama

नागपूर : क्रूज ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने (NCB) तिघांना सोडल्यावरून राजकारण केले जात आहे. ज्यांना सोडले, त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या एक जवळच्या व्यक्तीचाही समावेश आहे, असा पलटवार आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीने (अमली पदार्थ विरोधी पथक) भाजप कनेक्शनमुळे तिघांना सोडल्याचा आरोप केला होता.

Devendra Fadnavis
शाहरूख खानच्या मुलाला दिलासा नाही : एनसीबी कोर्टाने सुनावली कोठडी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी नागपुरात आले. विमानतळावरच पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवाब मलिक यांनी एनसीबीने भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना सोडल्याचा आरोप खोडून काढला. ते म्हणाले, एनसीबीने ज्याच्याविरोधात फोनमध्ये चॅट, कॉलसंबंधी काहीही पुरावे नाही, अशांची सुटका केली. ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे. याविरोधात काम करणाऱ्या एजेन्सीच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचे गरज आहे. हा कुठल्याही पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा व तरुणाईचा प्रश्न आहे. परंतु दुर्दैवाने त्याचे राजकारण केले जात आहे. एनसीबीने सुटका केलेल्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीचा समावेश आहे. परंतु त्याच्याविरोधात काहीही पुरावे नसल्याने आम्ही त्याचे नावही घेणार नाही. तो क्लिन असल्याने त्याला बदनाम करणे अयोग्य आहे, असेही फडणवीस म्हणाले. एनसीबीनेच स्पष्ट केले की पुरावे नसलेल्यांना सोडले, ते कोणत्या पक्षाचे होते, हा विषयच येत नाही, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis
नवाब मलिकांचा एनसीबीवर 'बॉम्ब';पाहा व्हिडिओ

पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. राष्ट्रीय आपत्कालिन निधीचा आगाऊ निधी राज्य सरकारकडे जमा असतो. त्यातून राज्याने नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. सर्वेक्षणानंतर केंद्राकडे निधी मागायचा असतो. मीही मुख्यमंत्री होतो, नुकसानभरपाई देण्यासाठी एवढा वेळ थांबण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

अजित पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर पडलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छाप्याबद्दल बोलताना ते म्हणाले की पवार कुटुंबात अनेकजण आहेत. ते त्यांचे व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यामुळे या विभागाची कारवाई केवळ पवार कुटुंबीयांविरोधात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.

Related Stories

No stories found.