अजित पवार सपोर्ट करत नाहीत.. बडे साब सब देख रहे है! : फडणविसांच्या आरोपांनी खळबळ

Devendra Fadnavis यांचे विधासभेत घणाघाती आरोप
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज भाजप नेत्यांना विविध गुन्ह्यांत अडकविण्यासाठी सरकारी वकील पी. पी. चव्हाण हे कसा कट रचत आहेत, याचा आरोप करत या संभाषणाच्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप आज विधानसभेत सादर केल्या. त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.

फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे

सकल मराठा शिक्षण मंडळाच्या वादात भोईटे गटाच्या वतीने गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक यांनी पाटील गटाला किडनॅप केले, अशी खोटी केस केली. गिरीश महाजन यांना मोक्का लागला पाहिजे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. विरोधकांची कत्तल कशी करायचे याचे षड्यंत्र आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण हे आहेत. कथा खूप मोठी आहे त्यामुळे 25 ते 30 वेब सिरीज होतील. मी जी कथा सांगत आहेत ती सत्य आहे. ज्याचे व्हिडीओ मी दिलेत. या सरकारी वकिलाचे कार्यालय आहे त्यामध्ये नियोजन केले जाते. गुन्हेगारी स्वरूपाचा कट सरकारी वकील करतो. यात एक मंत्री देखील आहे. अनिल देशमुख असते तर फायदा झाला असता, असे या व्हिडिओमध्ये आहे. अजित पवार सपोर्ट करत नाही पण बडे साहब सब देखते है असे देखील व्हिडीओ आहेत.

या व्हिडीओ मधील काही संभाषण पुढीलप्रमाणे

तो (फिर्यादी) गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का? ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण?सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.

Devendra Fadanvis
रशिया युक्रेन युद्ध काळात पुतीन यांचे एअर होस्टेससोबतचे फोटो व्हायरल

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील इतर मुद्दे पुढीलप्रमाणे

प्रवीण पंडित चव्हाण हे कोण आहेत ?

हे विशेष सरकारी वकील आहेत. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, बीएचआर बँक, रवींद्र बराटे आदी प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. आता अलिकडेच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला, त्यातही विशेष सरकारी वकील हेच आहेत.

• या वकिलांचे कार्यालय आहे की, महाविकास आघाडी सरकारचा राजकीय कत्तलखाना अशी स्थिती आहे.

गिरीश महाजन प्रकरण?

गिरिश महाजन, रामेश्वर नाईक आणि इतर २९ लोकांवर एक गुन्हा निंभोरा पोलिस ठाणे, जळगाव येथे नोंदविण्यात आला. एफआयआर क्रमांक (०१४४/२०२०)

भादंविचे कलम १२० बी, ३३१, ३८४, ३७९, ४४७, ५०४, ५०६ (२), ५११, १०९ आणि ३४ अशी कलमं लावण्यात आली.

नंतर हा गुन्हा ५ जानेवारी २०२१ रोजी कोथरूड पोलिस ठाणे, पुणे येथे स्थानांतरित करण्यात आला.

- चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जचा ते धंदा कसा दाखवायचा, रेड कशी टाकायची, रेडमध्ये वस्तु कशा प्लांट करायच्या आणि कसेही करून ही केस मोक्कामध्ये कशी फिट बसेल, याचे नियोजन, गुन्हेगारी स्वरूपाचा कट एक सरकारी वकील करतो, याची ही निर्लज्ज कथा आहे.

या सरकारी महाकत्तलखान्याच्या नायकाची ही कथा आहे. अर्थात

यातील महानायकही मोठे आहेत.

- हे संपूर्ण कुभांड कसे रचले गेले, कसा एफआयआर या वकिलांनीच

ड्राफ्ट करून दिला? - कसे साक्षीदार तयार केले गेले?

- घटनाक्रम जोडण्यासाठी कशाकशाची मदत घेतली गेली ?

- जबान्या कशा पाठ करून घेतल्या ? - यासाठी हॉटेल बुकिंग कुणी केले ?

- कॅशने पैसे कुणी दिले?

- तपास करणाऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला फोनवर कशा सूचना दिल्या गेल्या ?

- आणखी इतर किती प्रकरणे या महोदयांकडे आहेत, - ती कुणाच्या इशाऱ्यावर आली आहेत,

- कोणते नेते या विशेष सरकारी वकिलामार्फत सुडाचे राजकारण करतात ?

- किती फाईली त्यांच्याकडे असल्याचा दावा आहे ?

- त्यासाठी कोण-कोण लोक पाठपुरावा करतात, - कोण कुणाला काय करायला सांगते आहे,

- त्यांचे टार्गेट काय आहे, हे मी सांगणार नाही.

- ही संपूर्ण कथा स्वत: हे विशेष सरकारी वकील आपल्याला सांगणार आहेत.

- महाविकास आघाडीच्या कारागृहात गेलेल्या आणि कारागृहाबाहेर आहेत.

- या सव्वाशे तासाहून अधिक रेकॉर्डिंगमधील काही महत्त्वाचा भाग मी आपल्याकडे सुपूर्द करतो आहे. यात असलेल्या नेत्यांबाबतची त्यांची मतं, भविष्यातील सर्व योजना, त्यांच्या कारनाम्यांबाबत असलेली माहिती यावरही ते स्वतःच प्रकाश टाकणार

Devendra Fadanvis
Video: 10 लाख जमा केल्याशिवाय याचिका नाही; गिरीश महाजन

(व्हीडिओ १)

वकिलांचा संवाद : आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचे आहे. ड्रग्जचा व्यवसाय करतो, हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशातून मोक्का लागत नाही. पण, सट्टयाच्या पैशातून ड्रग्ज म्हटले की मोक्का लागेल. १ ग्रॅमला लाख रूपये मिळतात, असे सांगायचे.

(व्हीडिओ २)

तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का ? ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण? सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.

Devendra Fadanvis
रशिया युक्रेन युद्ध काळात पुतीन यांचे एअर होस्टेससोबतचे फोटो व्हायरल

(व्हीडिओ ८)

- सारे जबाब मी लिहून दिले होते, त्यांनी हरवून टाकले. सगळा गोंधळात गोंधळ करून टाकला.

- पवार साहेबांनी डीजींना सांगितले. किती मिटिंगा झाल्या. सीपी ला रात्रभर बसविले. पवार साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होतो. मी मागच्या दारातून गेलो. त्यांनी फोन लावले. मी गाडीत बसलो, तर • लगेच डीजी चा फोन आला. सीएम, अजितदादा / वळसे पाटील / एसीएस, डीजी होते. सीपीला रात्रभर बसवून ठेवले. रजत नागपूरला निघून गेला. मग सीपीचे फोनवर फोन आले.

- सर्व निगेटिव्ह होते. मी कॉपी दिली. शेवटी पवार साहेबांना सांगून अधिकारी बदलविला. अनिल देशमुख असते, तर फायदा झाला असता. प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटीचेंबरला बसवा, असे पवार साहेबांचे ऑर्डर होते. अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान हलायचे नाही.

(व्हीडिओ ९)

- अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकाऱ्यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले.

Devendra Fadanvis
Mns : राज ठाकरेंकडून प्रतिसाद नसल्याने दाशरथेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र..

(व्हीडिओ १८)

- अॅड. प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा

चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण - रेडमध्ये सहभागी होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे, याची • सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकिलांनी बीफ केली आहे. अगदी सरकारचे रेस्टहाऊस सुद्धा बुक करून दिले आहे. वेज / नॉन-वेज जेवणापर्यंत सूक्ष्म नियोजन - जेवणाची / राहण्याची आणि रूम कुणाच्या नावाने बुक करायच्या,

कॅशमध्ये कसे पैसे द्यायचे, याची संपूर्ण कथा ते सांगत आहेत. - यासाठी कोणती मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या, असेही निर्देश दिले आहेत. खडसे साहेब सर्व पैसे देतील, असेही त्यांनी सांगितले.

(व्हीडिओ १०)

- त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता. एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे, तोवर तेथे फेकून द्यायचा. जप्त करायला काय लागते ?

- किती जणांनी माझे नाव या केससाठी रेकमंड केले? दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जून खोतकर, अनिल देशमुख, रमेश जाधव, गुलाबराव, हसन मुश्रिफ, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत, त्यांची पत्र मोबाईलवर दाखवितात. या सर्वांनी पवारांना पत्र दिले.

- गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे. नाव घेत नव्हते.

Devendra Fadanvis
'मोदी-शहांचं नाव घेतलं नाही तर नारायण राणेंची नोकरी जाऊ शकते'

(व्हीडिओ ११)

साहेबांना फोन करून मिटिंग लावली. मोक्कासाठी ऐकायला तयार नव्हते. १ दिवसांत एफआयआर ड्राफ्ट करून दिला. स्वतः अभ्यास करून कलमं लावली.

- अनेक कलमं लावली. पण त्यांनी परेच्या पर गहाळ केली.

(व्हीडिओ १९)

विजू पाटीलशी दूरध्वनी संवाद

- गिरीश महाजनचे नाव टाका. मी जबाब तयार करतो.

- पुढे काय बोलायचे, स्टेटमेंटमध्ये काय टाकायचे, हे सारे निर्देश देतो आहे. भोईटे जाईल, तेव्हा आपला माणूस जाईल आणि तेथे ऐवज ठेऊन देईल.

- कुणाकडून काय जबाब घ्यायचे, हेही समजावून सांगितले आहे.

(व्हीडिओ २०)

एसीपी सुषमा चव्हाण, पौर्णिमा गायकवाड, अॅड. प्रवीण संभाषण

- हॉटेलचे बिल देऊ नका, १० हजार दिले आहेत. - तेथे आपला माणूस ठेवा. तो दोन फाईलमध्ये गिरीश महाजन यांचे

फोटो ठेवायचे आहे.

- पंचांची नावे मी व्हॉटसअॅपवर पाठवितो. - दोन सायबर एक्सपर्ट ठेवा. ती आपली माणसं असतील.

- जे आपल्याला माहिती आहे, ते पोलिसांना कुठे माहिती आहे. दोन टेक्नीशियन सोबत ठेवायचे आणि ते ऐवज ठेवून देतील.

(व्हीडिओ २१)

एसीपी सुषमा चव्हाण यांच्यासोबत फोन कॉल - पंचनामा मॅनेज करा, की ६.३० वाजता ऑर्डर मिळाली पाहिजे.

- डीडीआर ओळखीचा असेल तर बोलाविणे. - जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अशा ठिकाणांहून

५ पंच लागतील. उद्या रविवार असल्याने ओळखीची माणसं आधीच

ठरवून घ्या.

- वकिल स्वतःच फोन करून माणसं ठरवितात. काही बोलू नका.

कारण मॅटर सेंसेटिव्ह आहे. फक्त शिपाई आयडेंटिफाय करून ठेवा.

(व्हीडिओ २२)

कुठल्यातरी मॅडमशी संवाद

- पवारसाहेबांकडे खडसे साहेबांना घेऊन जातो. मी, जयंत पाटील असे अजितदादांकडे जातो. मी स्वतः येणार नाही. कारण, मी आलो तर मी राष्ट्रवादीचा वकील आहे, याचा पुरावा मिळेल.

(व्हीडिओ २३)

Devendra Fadanvis
Video: ईडी ही भाजपची एटीएम मशीन; संजय राऊत

विजू पाटीलशी संभाषण

- अशी बातमी लीक करा, की अलका पवार आणि इतर डायरेक्टर यांच्यावरही रेड पडणार आहे आणि स्टे व्हॅकेट झाला आणि अटक होणार आहे, अशी सुद्धा बातमी पसरवा. त्यामुळे मॅटालिटी ख

होईल. - वीरेंद्र भोईटेला माफीचा साक्षीदार करायचे असेल तर वकिल लावावा लागेल. तो होत असेल तर आपण त्याला मदत करू.

विजू पाटील शी संभाषण

- चॅनेलला बोलावून सर्व दाखवा. त्यांना काय दाखवायचे ते सांगा. - गिरीश महाजन यांच्या पापाचा घडा भरला आहे, असे सांगा. - मागच्या भागात शिवाजी भोईटेने फोटो फेकले असतील, ते दाखवायला सांगा.

(व्हीडिओ ३)

या घटनेप्रमाणे साक्षीदार तयार करावे. गिरीश महाजनचे नाव घ्यायला सांगा. रामेश्वर आणि गिरीश महाजनचे नाव घ्या. सर्व जबाब वाचून काय अॅड करायचे ते करा.

(व्हीडिओ १२)

- कुणाला अटकवायचे? जयकुमार रावल, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, संजय कुटे, मुनगंटीवार

नागपूरहून मला फोन आला. पुढच्या आठवड्यात कुठे आहे, असे विचारले. मुंबईला केव्हा येणार? शुक्रवारी ये. मी गेलो, तेव्हा पीएस राऊत तेथे नव्हता. त्याने दुसऱ्याचा नंबर दिला. मी जातो मंत्रालयात तेव्हा कधीच माझी एन्ट्री नसते. ना जाण्याची ना येण्याची चर्चा केली.

(व्हीडिओ १४)

- मी सारे काही टाईप करून दिले. त्यांना फक्त ४ वर टाईप करायला सांगितले. खंडणीचे सुद्धा मी तयार करून दिले. सुनील गायकवाड पुण्यात केव्हा आला, याची माहिती काढली. मग एफआयआरमध्ये

लिहिले. २ लाख कुठे दिले, ३ लाख कुठे दिले? मग आपण

काय दाखविले. किमया हॉटेल दाखवायचे होते. पण, उद्या कायद्यात अडकू नये म्हणून कुठे कॅमेरे तर नाही ना हे आधीच बघून आलो. उगाच रिस्क नको... संपूर्ण सर्वे केला.

(व्हीडिओ २५)

- कोणत्या दिवशी किडनॅप केले ते सांगा, असा प्रश्न विचारला तर सांगायचे पहिल्या आठवड्यात. तारीख कशाला सांगायची? काही भाग गिरीश महाजनला कळला, तर त्याने एफआयआर कॉपी मागवून घेतली. स्टे घेतला. आता प्रयत्न करतात.

मी कधी कुठे दिसतो का? मी एकतर सकाळी जातो किंवा रात्री उशीरा.

माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे पवार

साहेबांच्या सांगण्यावरून होते आहे.

(व्हीडिओ २४)

- गिरीश महाजन पुण्यात केव्हा आला, ती माहिती आपण घेतली. मंत्रालयातून काढली.

- अनिल देशमुख घाबरत नव्हते. त्यांना टार्गेट दिले की ते करायचे. जयंत पाटील/खडसे चांगले संबंध. त्यांनी डायरेक्ट सांगितले होते की, चव्हाण आला की पाहून घ्यायचे.

- फडणवीस गेला तर एक मतदारसंघ अनिल देशमुखच्या मुलासाठी मोकळा झाला असता. पैसा खूप लागतो एका स्टेजनंतर

- आपले टार्गेट कोण कोण आहेत ?

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे.

फाईली तयार आहेत. हेच आपले टार्गेट आहे.

(व्हिडिओ १३)

- साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको. पण, शरद पवार यांना संपवायचेच आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना १ लाख १ टक्के, गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच. पुढच्यावर्षीपर्यंत काढायचेच आहे. म्हणजे मग फडणवीस संपतो.

(व्हिडिओ १६)

- अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमाविले. १०० कोटींपेक्षाही अधिक. किमान २५० कोटी तरी.

- नुसते बदल्यांमध्ये नाही, तर वाहन खरेदी, बांधकामाचे टेंडर भरपूर

मार्ग असतात.

२ वर्षांत २५० कोटी रुपये तरी कमविले असतील. काय लागतं. मुंबईत १०० तरी मोठे बिल्डर्स आहेत. प्रत्येकाने २/३

कोटी दिले तरी २००-३०० कोटी सहज जमा होतात. बिल्डर्ससाठी २ कोटी काही मोठी रक्कम नाही.

एक नक्की की, अनिल देशमुख आपल्या कामी आला असता. मी साहेबांचा माणूस. पण, माझा फोटो ठेवत नाही. संबंध दाखवित नाही, कधी स्टेटस ठेवत नाही.

(ऑडिओ १)

- पवार साहेबांची वेळ घ्या, तोवर काही शक्य नाही. अनिल देशमुख गेल्याने खूप नुकसान झाले. वळसे काहीच करीत नाही. आतापर्यंत अटक होऊन संपून गेले असते. कोर्टात काय भूमिका मांडायची, हे तेच ठरवतात. ते म्हणतील ते ठरते.

(ऑडिओ २)

- गिरीश महाजन डायरेक्ट नाव येईल, असे स्टेटमेंट घ्या. विश्वजितचे स्टेटमेंट घ्या. १८ चे स्टेटमेंट झाले तर मजा येईल. एक लेडिज कोण

आहे, तिचे स्टेटमेंट घेतले तर त्याला अटक होऊन जाईल.

Devendra Fadanvis
संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाले आणि महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला...

(ऑडिओ ३)

- राजकारण करायचे असेल तर सीपी, सीआयडी, ईओडब्ल्यू हे सारे तुमचे पाहिजे. मोठ्या साहेबांनी सांगितले. देशमुख २५ लाख रुपये घेऊन आले होते. पण, मी घेतले नाही. नंतर तो पकडला गेला. २५ लाखांत आपली गाडी झाली असती. तो स्वतः देत होता, तरी आपण घेतले नाही. नशिब कसे असते पहा. पण, त्याच दुःख नाही. आपलीच

माणसे आहेत. तो माणूस पाहिजे होता.

(ऑडिओ ४)

- सातभायेने छगन भुजबळला पैसे घेऊन सोडले. मुंबईला एक पाटणकर नावाची वकील आहे. जज मॅनेज करणे, एवढेच तिचे काम आहे. १ कोटी ठरले, तर ५० लाख ती ठेवते आणि ५० लाख देते. गिरीश महाजनची फाईल होती, ती पुढे सरकवायला पाहिजे. रावलला आतमध्ये टाकले असते आणि महाजनला उचलले असते. हे दोन उचलले असते, तर हादरून गेले असते.

(व्हीडिओ २६ ए)

(अनिल गोटे यांच्याशी कॉल)

ते संजय राऊतने साडेतीन नेते सांगितले ते कोण ?

तावडे / गिरीश महाजन / रावल / देवेंद्र फडणवीस / रणजित पाटील सर्व फाईली आहेत आपल्याकडे. झेरॉक्स देतो. कुठे भेटणार? तीच आरबीआयजवळील ३०२ नंबरची खोली.

साहेबांची इच्छा आहे, करू आपण सगळे, खचून नका जाऊ. संजय राऊतांची वेळ घ्या, मी सोबत येतो. आपल्याजवळ सगळे आहे, करू आपण सगळे.

साहेबांशी माझे बोलणे झाले आहे. साहेब म्हणाले मी सांगतो. सीएम फाऊंडेशनचा गुन्हा आपण सोलापूर ग्रामीणमध्ये करतोय, साहेबांचे बोलणे झाले आहे..

(व्हीडिओ २७ बी)

अनिल गोटे आणि वकिलाचा संवाद

अनिल गोटेंची एन्ट्री, सीएम रिलिफ फंडची फाईल घ्यायला आलो. वकिल महोदय सांगतात, सापडत नाही. शोधून देतो. ओरिजिनल साहेबांकडे आहे. माझ्याकडे झेरॉक्स आहे. आपल्याकडे ४ फाईली आहेत. पांडे साहेबांना सांगून रजिस्टर करून घेतो. पांडे साहेब शंभर टक्के करणार म्हणजे करणार. तो एकमेव माणूस आहे. पाया पडला.

(व्हीडिओ २८ सी)

वकिल : मंगेश चव्हाणची फाईल देतो.

गोटे : मंगेश चव्हाणच्या फाईलमध्ये मला इंटरेस्ट नाही. • वकिल : मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश म्हणजे देवेंद्र फडणवीस

(व्हीडिओ २९ डी)

गोटेंना फाईल देताना वकिलाचा असिस्टंट म्हणतो की, आपण एक कॉपी काढून ठेऊ या. वकील म्हणतात, गोटे आणि आपण काय वेगळे आहोत काय, त्यांच्याकडे फाईल असली म्हणजे आपल्याकडेच आहे. ते मंत्री झाले, म्हणजे आपण मंत्री झालो. मी तुम्हाला एक्सपर्ट माणूस देतो, तो धुळ्याला येईल आणि तुम्हाला संपूर्ण फाईल समजावून सांगेल.

(व्हीडिओ ३० ई)

पवार साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे रिटायर होतो आहे. आता तो मुंबई सीपी झाला आहे. त्याने सांगितले की, मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसविले आहे. मी रजिस्टर करायला लावतो, असे त्याने सांगितले आहे. जयंत पाटील साहेब बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रपरिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा. मग आम्ही हायकोर्टात जाऊ. तोवर मेडिकलची फाईल सापडेल. भाजपाला १० कोटी रुपये देणगी मिळाली, याची तुम्ही तक्रार करा. या एका पत्रामुळे नवाब मलिकची चौकशी स्टॉप होईल.

(व्हीडिओ ३१ एफ)

अॅड. एम. डी. पाटील यांचा कॉल येतो आणि ते रश्मी शुक्ला प्रकरणात टेलिग्राफ अॅक्टनुसार ओपीनियन ड्राफ्ट करून मागतात. सदर वकिल त्यांना ते ड्राफ्ट करून पाठवितो, असे उत्तर देतात. अॅड. एम. डी. पाटील पुण्यातील सरकारी वकील आहेत रश्मी शुक्ला प्रकरणात.

(व्हीडिओ ३२-जी-एच)

वकिल : साहेबांनी नगराळेला सांगितले, जयंत पाटील यांनी सांगितले. पण, ऐकतच नाही, काय करायचे?

साहेब म्हणाले, तुला जे जे पाहिजे ते ते कर.

फोन टॅपिंग प्रकरणात मी खूप मागे लागलो, तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला.

वकिल : आपले जजेस आणायचे. कोर्टात थोडी आरडाओरड करायची आणि मग जजने ऑर्डर करायची.

Devendra Fadanvis
सहकार विभागाच्या कारवाईआधीच दरेकरांनी दिला पदाचा राजीनामा

(व्हीडिओ ३४-जे)

नवाब मलिक यांनी सांगायचे असते की, हा जो फ्रॉड आहे तो मला देवेंद्र फडणवीस यांनीच करायला सांगितला. जे १० कोटी भाजपाला दिले, ते डोनेट करायला मला देवेंद्र फडणवीस असे सरकारी वकिल म्हणतात,यांनीच सांगितले आणि मी ते केले, असेही सांगायचे. निवडणुकीच्या आधी की नंतर? जोरदार पत्रपरिषद् घ्या!

महाजन ते गोटे यांना विचारतात, २०१४ मध्येच डोनेट केले ना? केव्हा केले

जयंत पाटील यांना कॉल

अनिल गोटे जयंत पाटील यांना फोन लावतात आणि म्हणतात, आम्हाला भेटायचे आहे, तुम्हाला अर्जंट. उद्या मुंबईत भेटायचे काय ? मग हा फोन चव्हाण यांना देतात. मग ते बोलू लागतात, मागचे विषय राहिले आहेत. आता पांडे साहेब आले आहेत. मेडिकलची फाईल आहे. उद्या किती वाजता ? ३ वाजता का? यांना एक तक्रार ड्राफ्ट करून देतो आहे. उद्या ते ईडीकडे जाणार आहेत. या कॉलवर बोलले तर चालेल ना. जयंतराव सांगतात, फेसटाईमवर बोला. मग फेसटाईमवर फोन लावला जातो. पण, जयंतराव उचलत नाहीत.

(व्हीडिओ ३५ - के)

वकिल महोदय अनिल गोटेंना सांगतात.

जोरदार आरोप करा आणि सांगा की यातील एकही आरोप खोटा निघाला तर सर्व प्रॉपर्टी दान करून टाकीन. असे करण्यापूर्वी सर्व संपत्ती आपल्या मुलाच्या नावे करून टाका.

वकिल : तुम्ही आरोप करायचे आणि मग आपल्या लोकांना सभागृहात बोंबाबोंब करायला लावायची.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com