Devendra Fadanvis : तुमच्या नाकाखालून आम्ही सरकार घेऊन गेलो : फडणवीसांचा पलटवार

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvissarkarnama

Devendra Fadanvis : तीन पक्ष एकत्र येऊनही इतका छोटा मोर्चा निघाला. ड्रोन शॉट दाखवण्या इतपतही मोर्चा निघाला नाही. आम्ही तुमच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो पण तुम्ही काहीही करु शकले नाही. त्यामुळे आमचं हे सरकार टिकणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, पुढच्या वेळीही आम्ही त्यांच्या नेतृत्त्वात निवडणुका लढणार आणि आम्हीच पुन्हा सत्तेत येणार, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांना डिसमिस केल्याचे सांगणारा हा महामोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. आजच्या मोर्च्यात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर राऊतांनी निशाणा सााधला.  राज्यपालांना एक मिनिटसुद्धा खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. हे राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेले पहिलं पाऊलं आहे. महाराष्ट्र्ची जनता हे सरकार उधळुन टाकण्यासाठी एका संधीची वाट पाहत आहे.  असं राऊत यांनी म्हटलं होतं. याला फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. याच्या निषेधार्ष आज महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सह राज्यभरातील सर्वसामान्य जनता आणि अनेक लहान -मोठ्या पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com