Devendra Fadanvis : 'पत्रकाराने विचारलं, 'तुमचं वजन कमी झालंय का?' ; फडणवीसांचं अनोखं उत्तर..

Devendra Fadanvis : तुम्ही मुख्यमंत्री राहिला आहात. आता उपमुख्यमंत्री आहात.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvissarkarnama

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आपल्या हजरजबाबीपणामुळे ओळखले जातात. एका वृत्तवाहिनीने फडणवीस यांची दिर्घ मुलाखत घेतली. यावेळी काही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना त्यांच्या शारीरीक व राजकीय वजनाबद्दल प्रश्न विचारले, यावेळी त्यांनी या प्रश्नांची आपल्या वेगळ्याच शैलीत उत्तर दिले. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

"तुम्ही तुमचं शारीरीक वजन कमी केलंय का? काहीतरी जादू करून तुम्ही तुमचं शारीरीक वजन कमी केलंय, असं दिसतं. तुम्ही मुख्यमंत्री राहिला आहात. आता उपमुख्यमंत्री आहात, यामुळे तुमच्या शारीरीक वजनाप्रमाणे तुमचं राजकीय वजन ही कमी झालं आहे का? असा थेट प्रश्न माध्यम प्रतिनिधीने फडणवीसांना विचारला.

Devendra Fadanvis
शरद पवार यांची रुग्णालयातून राष्ट्रवादीच्या शिबिरात हजेरी; आव्हाडांची भावूक फेसबुक पोस्ट, म्हणाले...

यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, माझं शारीरीक वजन किती कमी झालंय हे मला माहिती नाही. मात्र माझ्या टेलरला मी टाईट केलं आहे. यामुळे टेलरने असे कपडे शिवायला सुरू केलं की, ज्याने वजन कमी दिसेल. आणि राजकारणात वजन तुम्ही कोणत्या पदावर आहात याने ठरत नाही. आपलं वजन राजकारणात आपण कोण आहोत, यावरून ठरत असतं. महाराष्ट्रात कोणालाही विचारा, तुम्हाला माझं वजन कमी झालंय की जास्त ते कळेल, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
फडणवीसांनी कॉंग्रेसचे २२ आमदार फोडलेत ; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, पाच वर्ष आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण केलेल्या फडणवीस यांना आताच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर बसावे लागल्यामुळे विरोधकांकडून वेळोवळी त्यांना हिणवण्यात येत होते. या मुद्द्यावर त्यांना डिवचण्यात येत होतं. यावर आता खुद्द फडणवीसांनी एकप्रकारे प्रत्युत्तर दिले. आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com