फडणवीसांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळलं; महाडिकांना तर राऊतांपेक्षा जास्त मत...

Rajyasabha Elelction 2022| Devendra Fadanvis| राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला.
फडणवीसांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळलं;
महाडिकांना तर राऊतांपेक्षा जास्त मत...
Devendra Fadanvis

Rajyasabha Elelction 2022

मुंबई : आमचे तिन्ही उमेदवार विजयी झालेत. हा विजय आम्ही लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांना अर्पण करतो. धनंजय महाडिक यांनी संजय राऊतांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणूकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांना आम्ही त्यांच्या वाढदिवशी कोल्हापूरचा पैलवान दिला, अशा भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत, काँग्रेसचे (Congress) इमरान प्रताप गढी, राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले. मात्र, महाविकास आघाडीची 9 मते फुटल्याने संजय पवार यांना पराभव झाला.

Devendra Fadanvis
आघाडीची मतं फुटली नाही, फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली : शरद पवार

या निवडणूकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे मत बाद झाले ते ग्राह्य धरले असते तरी आमचा विजय झाला असता. मलिक-देशमुख असते तरी आमचा विजय झाला असता. आमच्यासोबत नव्हते अशा आमदारांचेही आभार मानतो. जे स्वत:ला महाराष्ट्र,मुंबई समजतात त्यांना आता समजले असेल की ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत. विजयाची मालिका अशीच सुरू राहिल. चंद्रकांत दादांना वाढदिवसाची भेट म्हणून कोल्हापूरचा पैलवान दिला आहे. पियूष गोयल यांना केवळ राज्यसभेचे खासदार म्हणून नव्हे तर राज्यसभेचे नेते म्हणून निवडून दिलं आहे. या विजयाचे श्रेय पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना दिले आहे.

राज्यसभा निवडणुकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या उमदेवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा धनंंजय महाडिकांनी जास्त मतं घेतली. २०१९ मध्ये राज्यातल्या जनतेने भाजपला जनमत दिले. पण महाविकास आघाडीने आमच्या पाठीत सुरा खुपसून ते काढून घेतले. अशा पद्धतीने स्थापन झालेले सरकार किती अंतर्विरोधाने भरलेले असू शकते, हे आजच्या विजयाने स्पष्ट झाले आहे, असं म्हणत फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in